22 January 2021

News Flash

VIDEO: भारतीय जवानाचा हा भन्नाट हिप-हॉप डान्स पाहिलात का?

या व्हिडीओला २८ लाख ५० हजारहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत

या व्हिडीओला ६७ हजार शेअर्स मिळाले आहेत

भारतीय लष्करलाचा व्हिडीओ म्हटलं की कॉम्बिंग ऑप्रेशन, लढाईची पुर्वतयारी, परेड असे प्रसंग डोळ्यासमोर येतात. मात्र सध्या भरातीय लष्करातील एका जवानाच्या हिप-हॉप आणि लॉकिंग डान्सचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. कैलाश खैर, आरडीबी आणि नंदी कौर यांच्या आलू चाट या गाण्यावर हा जवान थिरकताना दिसत आहे. हा जवान मनसोक्त नाचत असतानाच त्याचे सहकारी त्याच्या आजूबाजूला उभे राहून टाळ्या वाजवत त्याला प्रोत्साहन देताना दिसत आहेत.

पाच ऑगस्ट रोजी डिेफेन्स लव्हर या फेसबुक पेजने पोस्ट केलेल्या या व्हिडीओला २८ लाख ५० हजारहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. तर  १ लाख २७ हजार रिअॅक्शन्स, तीन हजारहून अधिक कमेन्ट आणि ६७ हजार शेअर्स या व्हिडीओला मिळाले आहेत. विशेष म्हणजे व्हायरल झालेला हा व्हिडीओ त्या जवानापर्यंतही पोहचला असून त्याने याच व्हिडीओ पोस्टवर कमेन्ट करुन नेटकऱ्यांनी दिलेल्या प्रेमासाठी धन्यवाद म्हटले आहे. दिपेश थापा असे या तरुण जवानाचे नाव असून तो या व्हिडीओमध्ये एकाहून एक सरस डान्स स्टेप्स करताना दिसत आहे. दिपेश हा मुळचा देहरादूनचा असल्याचे त्याच्या फेसबुक प्रोफाइल वरून समजते. याच व्हिडीओ पोस्टवर दिपेशच्या नात्यातील गुरुजीत सिंग यांनी कमेन्ट केली असून, दिपेश हा माझा भाऊ आहे. त्याला डान्समध्ये करियर करायचे होते. पण त्याच्या नशिबात वेगळंच काहीतरी लिहीलं असल्याचे म्हटलं आहे.

नेटकऱ्यांना दिपेशचा डान्स प्रचंड आवडल्याचे या व्हिडीओच्या व्हायरल होण्यावरूनच समजते. काही हजारांमध्ये शेअर, कमेन्ट आणि रिअॅक्शन्स मिळवणाऱ्या या व्हिडीओच्या कमेन्टमधून लोकांनी या व्हिडीओबद्दल आपली मते व्यक्त केली आहेत. कोणी दिपेश हा बॉलिवूडमधील अनेक अभिनेत्यांपेक्षा अनेक पटींने छान नाचतोय असं म्हटलंय तर कोणी भारतीय लष्करातील जवानांकडेही ही सुद्धा कला असते हे पाहून आश्चर्य वाटल्याचे मत नोंदवलं आहे. तर काहींनी इतका छान डान्स करुनही तू त्यामध्ये करियर करण्याऐवजी देशसेवेसाठी लष्करात भरती झालास हे खूपच अभिमानास्पद असल्याचे सांगत दिपेशला सॅल्यूट केला आहे.

हा व्हिडीओ तुम्हाला कसा वाटला हे कमेन्ट सेक्शनमध्ये नक्की कळवा.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 9, 2018 6:16 pm

Web Title: video watch this stunning dance performance by indian army soldier dipesh thapa
Next Stories
1 स्मार्टफोन्सवर बंपर ऑफर्स, अॅमेझॉनचा फ्रिडम सेल सुरू
2 Xiaomi चा Mi A2 भारतात लॉन्च, प्री-बूकिंगलाही झाली सुरूवात
3 ‘ग्रेट वॉल ऑफ चायना’ आहे तरी कुठे? दोन लाईफ लाईन वापरूनही तिला उत्तर सापडेना
Just Now!
X