‘ब्रेकअप’ झाल्यानंतर कित्येक दिवस तरूण-तरूणी या धक्क्यातून सावरत नाहीत. जो जोडीदार आपल्याला हवाहवासा वाटतो, ज्याच्यासोबत आयुष्यातले सर्वात सुंदर क्षण आपण जगतो, कालांतराने त्याची प्रत्येक आठवण आपल्याला सुईसारखी बोचू लागते. त्याने प्रेमाने दिलेल्या वस्तू तितक्याच त्रासदायक वाटू लागतात, त्या कुठेतरी फेकून द्याव्यात, नजरेपासून त्यांना दूर करावं अशी तीव्र भावना त्याक्षणी मनात निर्माण होतात. पण व्हिएतनाममधल्या एका तरूणानं आपलं दु:खं हलकं करण्यासाठी हटके उपाय शोधून काढलाय. त्यानं चक्क आपल्या गर्लफेंड्नं दिलेल्या वस्तू बाजारात विकायला काढल्या.

राष्ट्राध्यक्षांशी घेतलेला ‘पंगा’ तिला पडला महागात

वस्तू फेकून दिल्या तर त्या फक्त नष्ट होतील, त्यापेक्षा एखादी गरजू व्यक्ती त्याचा चांगला वापर करेल या हेतूने डिन्ह थांग या तरुणानं प्रेयसीनं दिलेल्या सर्व वस्तू विकायला काढल्या. त्याची ही कल्पना सोशल मीडियावर खूपच चर्चेत आली. बघता बघता प्रेमभंग झालेले अनेक तरुण तरूणी त्याला सामील झाल्या. कित्येकांनी आपल्या प्रियकर, प्रेयसीने दिलेल्या वस्तू विकायला काढल्या. फेब्रुवारीमध्ये डिन्हनं सुरू केलेली ही संकल्पना एवढी लोकप्रिय झाली की, या ब्रेकअप मार्केटला तरुणांची तुफान प्रसिद्धी लाभली. जोडीदाराने दिलेला रुमाल, कपडे, ग्रिटिंग्ज, घड्याळं अशा अनेक वस्तू येथे विक्रीसाठी येथे उपलब्ध होऊ लागल्या. वस्तूसोबत प्रेमभंग झालेले अनेक तरूण तरूणी आपल्या अनुभवांची देखील देवाण-घेवाण करताना दिसत आहेत.

भेटा भातुकलीच्या खेळामधल्या खऱ्याखुऱ्या ‘बाहुली’ला