27 February 2021

News Flash

आयकार्ड विसरण्याच्या समस्येवर त्यानं लढवली अनोखी शक्कल

तुम्ही एखादी वस्तू किंवा गोष्ट सतत विसरत असाल तर काय करता?

तूमच्याकडून एखादी वस्तू किंवा गोष्ट सतत विसरत असेल तर काय करता? आलार्म लावत असाल किंवा कोणाला आठवण करून द्यायला सांगत असाल. पण, व्हिएतनाममधील एका तरूणाने विसरभोळेपणावर एक अनेखी शक्कल लढवली आहे. त्या तरूणाची ही करामत पाहून तुम्हीही चकीत व्हाल.

व्हिएतनाममधील एका तरुणाने चक्क हातावर नॅशनल आय डी कार्डचा टॅटू गोंदवला आहे. हो-चि-मिन्हचा (Ho Chi Minh City) या शहरातील ही घटना आहे. त्याचा हा फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. टॅटू गोंदवणाऱ्याच्या मित्राने सोशल मीडियावर ही पोस्ट टाकली आहे. त्यामध्ये तो म्हणते, ‘ माझा मित्र ड्रिंक्ससाठी जेव्हा बाहेर पडतो तेव्हा अनेकदा त्याच्या वयाचा पुरावा दाखवण्यासाठी आवश्यक आय कार्ड तो घरी विसरलेला असतो. नाईटक्लबमध्ये प्रवेश मिळावा म्हणून आता त्याने चक्क आयकार्ड हातावर गोंदवून घेतलं आहे.’ व्हिएतनाममधील या अजब टॅटूची सध्या सोशल मीडियामध्ये चर्चा आहे.

अशा प्रकराचा टॅटू काढण्यासाठी प्रथम आर्टिस्टनेही नकार दिला होता. मात्र, तो तरूणाने अनेकवेळा विनंती केल्यानं अखेर नाईलाजास्तव टॅटू आर्टिस्टलाही तो गोंदवून द्यावा लागला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 28, 2019 1:16 pm

Web Title: vietnam guy tattoos id card on his forearm
Next Stories
1 अॅमेझॉनच्या जंगलात आढळला दहा टन वजनी व्हेलचा मृतदेह; स्थानिकही हैराण
2 अनोख्या फास्ट फूड रेस्टॉरंटमधून त्यांनी कमावले सात हजार कोटी
3 ग्राहकांवर भरोसा ठेवणारं दुकानदारच नसलेलं दुकान
Just Now!
X