News Flash

‘नोटाबंदीनंतर फसलेला सर्वात मोठा प्रयोग म्हणजे विजय शंकर’, चाहते संतापले

'विजय शंकर हा कोहली आणि बुमराहचं घातक मिश्रण, तो बुमराहसारखी भेदक 'फलंदाजी' करतो तर कोहलीप्रमाणे मास्टर 'गोलंदाजी' करतो'

(सांकेतिक छायाचित्र)

भारतीय संघाने क्रिकेट वर्ल्ड कपमध्ये वेस्ट इंडिजवर 125 धावांनी मात करत आपला विजयी धडाका सुरूच ठेवला आहे. भारताचे गोलंदाज शानदार गोलंदाजी करतायेत, पण टीम इंडियाची सर्वात मोठी डोकेदुखी अद्यापही संपलेली नाही.

भारतीय संघात चौथ्या क्रमांकावर कोण खेळणार याचं योग्य उत्तर अजूनही मिळालेलं नाही. विश्वचषकात चौथ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी सहभागी करण्यात आलेला अष्टपैलू खेळाडू विजय शंकर याची कामगिरी खराब झाली आहे. त्याच्या खराब कामगिरीचा थेट परिणाम संघाच्या मधल्या फळीवर पडत असून त्यामुळे मधली फळी कोलमडते आणि मोठी धावसंख्या उभी करण्यासाठी संघाला झगडावं लागतंय. धोनीच्या अनुभवाच्या जोरावर भारतीय संघ रडतखडत सन्मानजनक धावसंख्या उभारतोय. विश्वचषकात आतापर्यंत खेळलेल्या तीन सामन्यांमध्ये शंकरच्या केवळ 58 धावा आहेत. विश्वचषकासाठी संघनिवडीच्या घोषणेवेळी प्रमूख निवडकर्ते एमएसके प्रसाद यांनी अंबाती रायडू याला डावलून विजय शंकर 3D खेळाडू असल्याचं म्हटलं होतं. शंकरने आतापर्यंत पाकिस्तानविरोधात केवळ 15, अफगाणिस्‍तानविरोधात 29 आणि वेस्‍ट इंडीजविरोधात अवघ्या 14 धावा केल्यात. इतक्या खराब कामगिरीनंतर सोशल मीडियामध्ये विजय शंकर तुफान ट्रोल होत आहे, तर ऋषभ पंत किंवा दिनेश कार्तिकला संघात स्थान देण्याची मागणी जोर धरत आहे. अनेकांनी तिखट शब्दांमध्ये विजय शंकरचा समाचार घेतला आहे.
एक नजर मारुया नेटकऱ्यांच्या प्रतिक्रियांवर –


विजय शंकरची निवड म्हणजे भारताचा नोटाबंदीनंतर फसलेला सर्वात मोठा प्रयोग


या फोटोत माधुरी दिक्षितची ओढणी जेवढी उपयोगी आहे तितकाच शंकर टीम इंडियासाठी उपयोगी आहे.


विजय शंकरला आपण का खेळवतो हेच समजत नाही, वर्तमानकाळात भारतासाठी खेळलेला हा सर्वात खराब क्रिकेटपटू आहे.


ऋषभ पंत डोळे बंद करुनही शंकरपेक्षा अधिक धावा काढेल


विजय शंकर म्हणजे कोहली आणि बुमराहचं घातक मिश्रण आहे. त्याची फलंदाजी बुमराहसारखी तर गोलंदाजी विराट कोहलीप्रमाणे आहे.


विजय शंकरपेक्षा या महान खेळाडूला तरी संधी द्या, तो चांगली फलंदाजी करु शकतो.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 28, 2019 1:27 pm

Web Title: vijay shankar trolled after worst performance in world cup 2019 sas 89
Next Stories
1 फिरकीविरुद्ध संथ फलंदाजी, सेहवागने धोनीवर साधला निशाणा?
2 VIDEO: तुंबलेले रस्ते, स्टेशनवरील ‘धबधबे’; पहिल्याच पावसात मान्सूनपूर्व तयारी गेली वाहून
3 नागपूर विद्यापीठात तीन जण प्यायले दीड लाखांची चहा काॅफी आणि …
Just Now!
X