ताडोबात दुर्मिळ अशा काळ्या बिबट्याचे दर्शन झाले आहे. युवा वन्यजीव छायाचित्रकार अनुराग गावंडे यांनी हे दृश्य कॅमेऱ्यात कैद केले आहे. रस्ता ओलांडताना त्याची ऐटदार चाल व्हिडिओत बघायला मिळतेय. चंद्रपूरचे पालकमंत्री आणि राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी फेसबुकवर दुर्मिळ अशा काळ्या बिबट्याचा व्हिडीओ पोस्ट केला आहे. त्याचप्रमाणे वडेट्टीवार यांनी सर्व पर्यटनप्रेमींना अशाप्रकारचं निसर्ग वैभव असणाऱ्या ताडोबा अंधारी प्रकल्पाला भेट देण्याचं आवाहन केलं आहे.

काळ्या बिबट्याचा व्हिडीओ पोस्ट करत असताना वडेट्टीवार यांनी एक पोस्टही शेअर केली आहे. यामध्ये ते म्हणाले आहेत की, ‘निसर्गवैभव ताडोबा अभयारण्यात आढळलेल्या दुर्मिळ काळा बिबट्याच्या या व्हिडिओ ने पर्यटकांचे लक्ष ताडोबा कडे वेधले आहे . युवा वन्यजीव छायाचित्रकार अनुराग गावंडे यांनी हे दृश्य त्यांच्या कॅमेरामध्ये कैद केले आहे .राज्यातील इतर पर्यटन प्रेमींनी सुद्धा पर्यटनासाठी ताडोबा ला पसंती देत सहकुटुंब मित्र परिवारासोबत भेट द्यावी.’

bmc, mumbai municipal corporation, Undertake Rs 209 Crore Drainage Project, Prevent Flooding, Andheri Subway, milan subway, bmc drainage project, mumbai monsoon, mumbai waterlogging, mumbai news,
अंधेरी सब वे पूरमुक्त करण्यासाठी आणखी २०९ कोटी, किमान तीन वर्षे लागणार
Barfiwala bridge
मुंबई : बर्फीवाला पुलाचा ‘पार्किंग’साठी वापर, क्रिकेट खेळण्यासाठी, कपडे वाळत घालण्यासाठी उपयोग
Race for immersion on Rangpanchami in the five rahadis of the Peshwa era
नाशिकमध्ये रहाडींमध्ये डुंबण्याची चढाओढ यासाठी…
Attack on hotel businessman
आपटे रस्त्यावर हॉटेल व्यावसायिकावर हल्ला करणारे गजाआड; संपत्तीच्या वादातून मेहुण्याकडून मध्य प्रदेशातील पहिलवानांना सुपारी

पाहा व्हिडीओ –

ताडोबाच्या कोळसा परिक्षेत्रात गेल्या तीन वर्षांपासून काळा बिबट्या वास्तव्यास आहे. हा बिबट्या पाहण्यासाठी अनेक पर्यटक ताडोबामध्ये हजेरी लावतात.