News Flash

फेकन्युज : भाजपची खिल्ली उडविण्यासाठीच ते छायाचित्र

‘फॉर अ करप्शन स्टेट’ अशी ओळ असलेले छायाचित्र ट्विटरवर ‘पोस्ट’ करून काँग्रेसच्या प्रसारमाध्यम प्रमुखांनी भाजपच्या प्रचाराची खिल्ली उडवली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा आणि कर्नाटक विधानसभा निवडणुकीत मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार असलेले बी. एस. येडियुराप्पा यांच्यासह ‘द हिंदू’ दैनिकाच्या पहिल्या पानावर जाहिरात छापून आली आहे. यात ‘फॉर अ करप्शन स्टेट’ अशी ओळ असलेले छायाचित्र ट्विटरवर ‘पोस्ट’ करून काँग्रेसच्या प्रसारमाध्यम प्रमुखांनी भाजपच्या प्रचाराची खिल्ली उडवली आहे. खरे तर भाजपच्या जाहिरातीत ‘फॉर अ करप्शन फ्री स्टेट’ अशी कॅचलाइन आहे. या कॅचलाइनमधील ‘फ्री’ हा शब्द काढून टाकण्यात आलेला होता. खरे तर काँग्रेसच्या प्रसारमाध्यम विभागाच्या प्रमुखांच्या ओळखीतील व्यक्तीने ‘व्हॉटस्अ‍ॅप’वर ‘फोटोशॉप्ड’ छायाचित्र पाठविले. हे छायाचित्र बनावट आहे, हे त्यांना माहीत होते. मात्र भाजपची समाजमाध्यमावर खिल्ली उडविण्यासाठी त्यांनी ही ट्विपण्णी केल्याचे म्हटले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 20, 2018 12:31 am

Web Title: viral fake photograph on bjp
Next Stories
1 स्मार्ट ‘वॉचआऊट’
2 झटपट होईल असा ओटसचा ब्रेकफास्ट
3 सेल्फ सर्व्हिस : संगणकीय की बोर्डची देखभाल
Just Now!
X