22 November 2017

News Flash

Ind vs Aus: अंपायरला ‘शक्तिमान’ व्हायचं होतं..

पुजाराच्या विकेटवर अंपायर कन्फ्युज्ड, ट्विटरवर हलकल्लोळ

लोकसत्ता टीम | Updated: March 20, 2017 8:37 AM

अंपायरला काय करावं सुचेना!

क्रिकेटविश्वात प्लेअर्ससोबत काही अंपायर्सनाही आजवर प्रसिध्दी मिळाली. अगदी डिकी बर्डपासून ते स्टीव्ह बकनर, बिली बाॅवडेन यासारख्या अंपायर्सना अनेक कारणांमुळे प्रसिध्दी मिळाली. अंपायर्सच्या या झळाळत्या यादीत काल ख्रिस गफाॅनी यांनीही स्थान मिळवलं

कालचा दिवस चेतेश्वर पुजाराच्या डबल सेंच्युरीने गाजला तसा तो अंपायर ख्रिस गफाॅनी यांच्यामुळेही गाजला. हेझलवूडच्या एका बाऊंसरवर पुजाराने पुल शाॅट मारण्याचा प्रयत्न केला. पण बाॅल त्याच्या बॅटच्या कडेजवळून मागे गेला. यावेळी काही फील्डर्सनी अपील केलं पण त्यात तितकासा दम नव्हता. पण यानंतर अंपायर गफाॅनी यांनी पुजाराला आऊट देण्यासाठी हात वर केला पण त्यानंतर त्यांनी विचार बदलला आणि आपण त्या गावचेच नाही अशा थाटात आपण आपली हॅट सरळ करत असल्याचा आव आणला. पण यामुळे गंमत व्हायची ती झालीच.

यानंतर साहजिकच ट्विटरवर धमाल रिअॅक्शन्स येऊ लागल्या.

 
१. जेव्हा गंगाधरला शक्तिमान व्हायचं असतं पण आपल्याला सगळे पाहत आहेत हे त्याच्या लक्षात येतं

२. परीक्षेत काॅपी करताना बाई तुमच्याकडे बघतात तेव्हा…

३. जाम वेळ झाला कोण आऊट झालं नाहीये. उडवायचा का याला? जाऊ दे खेळू दे

४. अरे याला आऊट कसं देऊ? आज बॅट यानेच आणली आहे.

First Published on March 20, 2017 8:37 am

Web Title: viral funny tweets on umpires mistake in india vs australia test