News Flash

Viral : अहो, GST स्टेशन कधी येईल?

सोशल मीडियावर खळखळाट

वस्तू आणि सेवा कर अर्थात जीएसटी म्हणजे नेमके काय? याचा सामान्य व्यक्तीच्या जीवनावर कशा पद्धतीने परिणाम होणार आहे? यासारखे अनेक प्रश्न एकीकडे अनेकांकडून विचारले जात असताना दुसरीकडे सोशल मीडियावर या विषयाला भलतेच उधाण आले आहे. जीएसटीविषयी प्रबोधन करणारे, याच्या परिणामांबाबत चर्चा करणाऱ्या पोस्ट व्हॉटसअॅप आणि फेसबुकवरुन फिरत आहेतच. पण या व्हायरल पोस्टसोबतच जीएसटीवरील जोक्सचाही सुळसुळाट दिसतो आहे.

जीएसटीबाबत इतकी चर्चा चालू असली तरीही एकूण असलेला गोंधळ लोकांच्या सामान्य व्यवहारातून दिसतो आहे. याचे उत्तम उदाहरण म्हणजे दक्षिण मुंबईकडे येणाऱ्या एका बसमध्ये एका व्यक्तीने दुसऱ्या व्यक्तीला विचारले GST स्टेशन कधी येईल? आता यावर काय बोलावे हे समोरच्या व्यक्तीला कळलेच नाही. हसू आणि राग आवरत त्या व्यक्तीने अतिशय शांतपणे उत्तर दिले की त्या स्टेशनचे नाव GST नाही CST आहे. व्हॉट्सअॅपवर हा किस्सा खूप वेगाने फिरतो आहे.

यामध्ये आलिया भट आणि राहुल गांधी यांच्यातील जीएसटीविषयीच्या संवादावर सध्या जोरदार चर्चा आहे. आलियाचे जोक्स याआधीही मोठ्या प्रमाणात गाजले आहेत.

राहुल गांधी – तुझे GST का मतलब भी पता है
आलिया – हाँ पता है
राहुल गाँधी – क्या है ?
आलिया – GoodNight SweetDreams TakeCare….

याशिवाय पती-पत्नींमधील जीएसटीशीसंबंधित एका जोकलाही नेटिझन्सकडून मोठ्या प्रमाणात पसंती मिळते आहे. तमाम स्त्री वर्गाच्या पार्लर आणि हॉटेलिंगच्या संदर्भातील हा जोकही चांगलाच गाजतो आहे.

*सर्व पतीना आवश्यक सूचना*
सर्व ब्युटी पार्लर व रेस्टॉरंन्टला २८ टक्के जीएसटी लागू होणार आहे, त्यामुळे ब्युटी पार्लर व रेस्टॉरंन्ट अधिक खर्चिक होणार आहे. त्यामुळे घरी पत्नीस त्या निसर्गत: खूप सुंदर आहेत व दिसतात याची खात्री पटवून द्या. तसेच त्या घरीच खूप छान स्वयंपाक करतात, यासाठी त्यांना प्रोत्साहित करा.
*लोकहितार्थ प्रसिद्ध*

याशिवाय व्हॉटसअॅप ग्रुपच्या अॅडमिनला संबोधित करणारा एक विनोदही वेगवेगळ्या ग्रुप्समध्ये फिरतो आहे. पाहूया काय आहे हा विनोद

ग्रुप ADMIN ला नोटीस ….
ज्या व्हॉटसअॅप ग्रुपमध्ये रोज २०० च्या वर मेसेजची देवाण घेवाण होते
त्या ग्रुपवर *GST* म्हणजे Group Service Tax बसणार आहे हो!
हा GST ग्रुप ADMIN ला भरावा लागणार याची नोंद घ्यावी.

याशिवाय पगारावर भाष्य करणाराही एक जोक फिरतो आहे. यामध्ये कमी पगार असलेले लोक आपली व्यथा जीएसटीच्या आधाराने मांडत आहेत.

आमच्या पगारावर थोडा GST लावून
तो पण वाढवून देता येईल का बघा
– आखिल भारतीय कमी पगार संघटना

एक गाण्याच्या स्वरुपातील रिंगटोनही व्हॉटसअॅपवरुन फिरते आहे. जीएसटी रिंगटोन म्हणूनच हा ऑडिओ प्रसिद्ध झाला आहे. यामध्ये कापड व्यापारांचे दुःख व्यक्त कऱण्यात आले आहे. पाहूयात काय आहेत या ओळी

व्यापारी एकता झिंदाबाद, कपडा व्यापार बचाना है, जीएसटी को हटाना है|

जीएसटीका अत्याचार, क्यो सहे कपडा व्यापार
ही नवी करप्रणाली १ जुलैपासून लागू होणार असल्याचेही सरकारने नुकतेच जाहीर केले होते. ‘एक देश, एक कर’ या संकल्पनेतून जीएसटीची अंमलबजावणी होणार आहे. मात्र जीएसटीच्या अंमलबजावणीसाठी अद्यापही पुरेशी तयारी करण्यात आलेली नाही. जीएसटीमुळे सर्वसामान्यांच्या दैनंदिन कामकाजावर परिणाम होणार आहे. औषध, अन्नधान्य, खाद्य पदार्थांपासून ते शीतपेयांपर्यंत परिणाम होणार आहे.

व्यापाऱ्यांना जीएसटी करप्रणाली समजावून सांगताना सीए (सोशल मिडियावर व्हायरल होणारा फोटो) व्यापाऱ्यांना जीएसटी करप्रणाली समजावून सांगताना सीए (सोशल मिडियावर व्हायरल होणारा फोटो)

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 29, 2017 3:14 pm

Web Title: viral jokes on gst on social media
Next Stories
1 Video : मगर घरात शिरली, अन्…
2 यू-ट्युबवर प्रसिद्ध होण्यासाठी तिनं प्रियकराला गोळी घातली
3 Video : लठ्ठ म्हणून थट्टा व्हायची, पण आता तिच्या पिळदार शरीरयष्टीचं कौतुक होतंय
Just Now!
X