16 December 2017

News Flash

काय हा ‘गाढव’पणा!; त्यानं चक्क अलिशान गाडी खायचा प्रयत्न केला

मालकाला मोठा भुर्दंड बसला आहे.

लोकसत्ता ऑनलाइन | Updated: September 29, 2017 5:18 PM

मार्कस झॅन यांनी आपली आलिशालान मॅक लॅरेन स्पायडर कार एका ठिकाणी पार्क केली होती. (छाया सौजन्य : AP)

जर्मनीमध्ये एक अजब गजब घटना घडली. गाढवाच्या ‘गाढवपणा’मुळे मालकाला मोठा भुर्दंड बसला आहे. गाजर समजून भुकेलेल्या गाढवाने एका आलिशान गाडीचा चावा घेण्याचा प्रयत्न केला, यात कोट्यवधीच्या गाडींचं मोठं नुकसान झालं असून गाढवाच्या चुकीबद्ल मालकावर लाखोंची नुकसान भरपाई देण्याची वेळ आली.

Viral Video : ‘ती’ ब्रिटनच्या प्रिन्सजवळील पॉपकॉर्न चोरी करते तेव्हा…

मार्कस झॅन यांनी आपली आलिशान मॅक लॅरेन स्पायडर कार एका ठिकाणी पार्क केली होती. या गाडीची किंमत जवळपास २ कोटी ३८ लाखांहूनही अधिक आहे. या गाडीचा रंग गडद भगव्या रंगाचा आहे. भुकेलेल्या गाढवाला ही गाडी मोठ्या गाजरासमान भासली आणि त्याने या गाडीचा चावा घेण्याचा प्रयत्न केल्याची माहिती ‘बीबीसी’ने दिली आहे. यामुळे गाडीचं मोठं नुकसान झालं. मार्कसनं गाढवाच्या मालकाकडे याची तक्रार केली, तसेच नुकसान भरपाईचीही मागणी केली पण मालक काही नुकसान भरपाई देण्यास तयार नव्हता. हा वाद वाढत गेला. पुढे हे प्रकरण न्यायालयात गेलं. आता न्यायालयानं गाढवाच्या मालकाला जवळपास ४ लाख ४० हजारांची नुकसान भरपाई देण्याचे आदेश दिले आहेत.

वाचा : नवरा मिळेना म्हणून चाळीशीतल्या बाईनं स्वत:शीच लग्न केलं!

First Published on September 29, 2017 5:13 pm

Web Title: viral story donkey tries to eat mclaren car