भारतामध्ये अनेक ठिकाणी लग्न समारंभामध्ये किंवा एखाद्या कार्यक्रमात लोकं दौलतजादा करताना दिसतात. भारतीयांसाठी अशाप्रकारे एखाद्यावर पैसे उडवलेलं पाहण काही नवीन राहिलेलं नाही. मात्र सध्या इंटरनेटवर व्हायरल होत असलेल्या एका व्हिडीओमध्ये पंजाबी लोकांनी नाचताना उडवलेल्या नोटा परदेशी लोकं गोळा करताना दिसत आहे. भारतीय नेटकरी या व्हिडीओवर चांगलेच रिअॅक्ट झाले असून अनेकांनी यावर ट्विट करत आपले मत नोंदवले आहे.

या एका मिनिटाच्या व्हिडीओमध्ये भारतीय पंजाबी लोकं पंजाबी गाण्यावर थिरकताना दिसत आहे. जोरदार आवाजात गाणी लावून हे लोक नाचत असतानाच त्यांनी अचानक खिशातून नोटा काढून उडवल्या. विशेष म्हणजे या पंजाबी लोकांनी चक्क डॉलरची उधळण करत आनंद व्यक्त केला. अचानक असा पैशांचा पाऊस पडू लागल्याने तेथे उपस्थित असणाऱ्या परदेशी नागरिकांनी पंजाबी लोकांनी उडलेले या नोटा उचलण्यास सुरुवात केली. या गोंधळातही पंजाबी लोकं गाण्यावर नाचत होती. त्यामुळे एकीकडे उडवल्या जाणाऱ्या नोटा आणि दुसरीकडे त्या गोळा करण्यासाठी धडपड करणारे परदेशी नागरिक असे चित्र एकाच वेळी दिसून आले.

फेसबुक, ट्विटवर हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला आहे. ट्विटवर अनेकांनी या व्हिडीओवर मजेदार प्रतिक्रिया दिल्या आहेत. काहींनी या पंजाबी लोकांनी भारतात बंद पडलेल्या एक हजाराच्या नोटा उडवल्याचे म्हटले आहे तर काहींनी भारत गरीब नाहीय ये पुन्हा सिद्ध झाल्याचे म्हटलेय. तर काहींनी अशापद्धतीने एकीकडे पैशाला लक्ष्मी म्हणायचे आणि दुसरीकडे तिची अशी उधळण करुन ती जमीनीवर पाडायची हा विरोधाभास असल्याचे मत व्यक्त केले आहे. त्यापैकीच काही मजेदार ट्विटस…

ओय की फरक पैंदा हैं…

अमेरिकेच्या कमाईचा नवा मार्ग

बापरे असंही असू शकतं

बदला घेतायत

आयुष्यात आता सगळं काही बघून झालयं

सब का बदला लेगा रे…

नोटा गोळा करणारे कोण?

लक्ष्मी म्हणायचं आणि…

अजून किती अच्छे दिन हवेत..

बदला…

हा व्हिडीओ नक्की कुठे आणि कोणी शूट केला आहे याबद्दलची ठोस माहिती समोर आलेली नसली तरी नेटकऱ्यांना हा व्हिडीओ प्रचंड आवडल्याचे दिसत आहे. म्हणूनच या व्हिडीओला दोन हजारहून अधिक रिट्विटस मिळाले असून तीन हजारहून अधिक लाइक्स मिळाले आहेत.