News Flash

Viral Video : सावत्र असली तरी आई ही आईच असते!

सावत्र आईच्या प्रेमानं चार वर्षांचा मुलगा झाला भावूक

सावत्रं आई म्हटलं की ती त्रास देणारी, मुलांना मारणारी आणि त्यांना वेळच्यावेळी खायला प्यायला न देणारी, असे एकंदर आपले गैरसमज असतात. अर्थात असे वाईट अनुभवही अनेकांना आले असतील. मात्र सावत्र आईने लग्नात घेतलेल्या शपथेमुळे ४ वर्षांच्या सावत्र मुलाला आपले अश्रू लपवणे अशक्य झाले. परदेशात लग्नाच्यावेळी वधूने काही शपथ घ्यायची असते. यावेळी या नववधूने ४ वर्षांच्या गेज या आपल्या होणाऱ्या मुलासाठी विशेष शपथ घेतली. या समारंभाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून त्याला अवघ्या काही वेळात १० हजारांहून अधिक व्ह्यूव्ज मिळाले आहेत.

ज्योशुवा निवेल आणि इमली लिहान हे विविहबंधनात अडकले. यावेळी त्यांच्या कुटुंबातील आणि मित्रमंडळींमधील १३० लोक उपस्थित होते. लिहान हिने गेजसाठी एक शपथ घेतली. ती म्हणाली, मला तू कायम सुरक्षित हवा आहेस, तुला उत्तम व्यक्ती झालेला पहायचे आहे. तिने असे म्हटल्यानंतर हा ४ वर्षांचा चिमुकला भर समारंभात धावत तिच्या मिठीत आला. हा प्रसंग उपस्थितांसाठीही अतिशय भावूक करणारा ठरला.

सौजन्य – फॉक्स न्यूज

लिहान पुढे म्हणाली, ‘मी जे काही करेन ते तुझ्या चांगल्यासाठीच असेल हे वयानुसार तुला कळायला लागेल. त्यामुळे जे बेस्ट असेल तेच मी तुझ्यासाठी करत राहीन. तू माझ्यासाठी खूप स्पेशल मुलगा आहेस त्यामुळे आय लव्ह यू’ लिहानने गेजला इतक्या चांगल्यापद्धतीने स्विकारले असल्याने मला तिचा खूप अभिमान आहे आणि मी अतिशय आनंदी आहे. निवेल हा नौदलात सार्जंट असून अशाप्रकारे आपल्या होणाऱ्या पत्नीने आपल्या मुलाला स्विकारणे हे अतिशय महत्त्वाचे आहे.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 29, 2017 11:30 am

Web Title: viral video 4 year old boy started crying after step mom heartfelt wedding vows
Next Stories
1 Viral Video : हे पाहा; शिक्षकांनी विद्यार्थ्यांना काय करायला लावले
2 व्हायरल होत असलेल्या वृद्ध जोडप्यांच्या फोटोशूटचं सत्य माहितीये?
3 Viral Video : नितीश कुमार यांनी मोदींसाठी गायलं खास गाणं
Just Now!
X