09 March 2021

News Flash

Viral Video : काही फूटांवरुन ‘उडत आला’ रिक्षाचालक आणि…

या विचित्र अपघाताचा व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय

सध्या व्हॉट्सअपवर एक व्हिडिओ तुफान व्हायरल होत असून यामध्ये रिक्षाजवळ उभा असणारा एक व्यक्ती अचानक काही फूटांपर्यंतचे अंतर उडून एका महिलेवर पडल्याचे दृष्य दिसत आहे. अनेकजण या व्हिडिओमध्ये नक्की काय घडलं आणि हा व्यक्ती एवढ्या लांबवर कसा काय फेकला गेला यासंदर्भातील चर्चा सोशल नेटवर्किंगवर करत आहे. मात्र बेंगळूरु मिररने दिलेल्या वृत्तानुसार हा सर्व प्रकार एका तारेमुळे घडल्याचे वृत्त दिलं आहे. हा सर्व प्रकार सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झाला असून हे सीसीटीव्ही फुटेज आता व्हायरल होत आहे. आधी आपण व्हायरल होणारा व्हिडिओ पाहूयात…

नक्की काय घडलं?

बेंगळुरुमध्ये १६ जुलै रोजी हा सर्व प्रकार घडला. या अपघातामध्ये ४२ वर्षीय सुनिता के. या जखमी झाल्या आहेत. मिळालेल्या माहितीनुसार रिक्षाजवळ उभ्या असणाऱ्या व्यक्तीच्या पायामध्ये वायर अडकल्याने हा अपघात झाला. येथील टीसी पालया रोडवर पडलेली वायर रिक्षाचा पुढच्या चाकामध्ये अडकल्याने चालक खाली उतरुन ती वायर काढत होता. मात्र हे करत असतानाच रस्त्यावर पडलेल्या या वायरवरुन एक मोठी गाडी गेली. ज्यामध्ये ही वायर अडकली आणि हा चालक त्यामुळे खेचला गेला. वायर अगदी जास्त शक्तीने ओढली गेल्याने हा चालक काही फूट अंतर उडाला आणि बाजूने चालणाऱ्या सुनिता यांच्यावर जाऊन आदळला. सकाळी साडेअकराच्या सुमार हा सर्व प्रकार घडला. सुनिता या अन्नपूर्णेश्वरी या हॉटेलमध्ये काम करतात. त्या कामावर जात असतानाच हा अपघात झाला. काही कळण्याच्या आतच हा सारा प्रकार घडला असं सुनिता सांगतात.

नक्की पाहा >> Viral Video : चार नाही सात हत्ती आहेत या व्हिडिओत; तुम्हाला सापडतायत का पाहा बरं

पडले ५२ टाके

“कोणीतरी माझं नाव घेतल्याने मी मागे पाहिलं आणि मी मागे वळाले तेव्हा रिक्षा चालक माझ्या दिशेने उडत येताना दिसला”, असं सुनिता यांनी सांगितलं. “चालक माझ्यावर पडल्याने मी जमीनवर पडले. माझ्या मानेला दुखापत झाल्याने रक्तस्त्राव होऊ लागला. काय करावे मला काहीच सूचत नव्हते. मी तिथेच बसून कोणीतरी मदतीला येईल याची वाट पाहत होते,” असं या घटनेबद्दल बोलताना सुनिता म्हणाल्या.

नक्की पाहा >> Viral जाहिरात : बाजारात आला ‘राफेल पान मसाला’

आरोग्य अधिकारी असणारे सुनिताचे पती कृष्णमुर्ती यांनी तातडीने सुनिता यांना जवळच्या रुग्णालयामध्ये नेलं. तिथे सुनिता यांना ५२ टके पडले. या अपघातामध्ये चालकाला जास्त दुखापत झाली नाही. मात्र या घटनेमुळे रस्त्यावर पडून असणाऱ्या वायर्ससंदर्भातील धोका पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 3, 2020 1:39 pm

Web Title: viral video auto driver comes flying and crashes into woman scsg 91
Next Stories
1 ईईई… सांबारमध्ये मृत पाल, व्हिडीओ झाला व्हायरल; गुन्हा दाखल
2 Viral : इंटरनेटचा स्पीड चांगला येतो म्हणून थेट छतावरुन बसून पीक विम्याचे अर्ज भरतोय अधिकारी
3 जयंती विशेष : प्रतिसरकार ते संसदेत मराठीत भाषण करणारे ते पहिले खासदार; जाणून घ्या क्रांतीसिंह नाना पाटील यांच्याबद्दल
Just Now!
X