30 September 2020

News Flash

Viral Video: लॉकडाउनदरम्यान पोराचं वजन वाढलं, शाळेचा गणवेश घालताना पालकांची उडाली तारांबळ

हा व्हिडिओ ठरतोय चर्चेचा विषय

करोनामुळे जगभरातमध्ये भीतीचे वातावरण आहे. अनेक देशांमध्ये काही आठवड्यांच्या लॉकडाउननंतर आता हळूहळू सार्वजनिक सेवा सुरु करण्यात आल्या आहेत. मात्र असं असलं तरी अनेक देशांनी शाळा बंद ठेवण्याचा निर्णय कायम ठेवला आहे. त्याचवेळी चीनमध्ये अनेक भागांमधील शाळा सुरु झाल्या आहेत. मात्र शाळा सुरु झाल्यानंतर आता काही पालकांसमोर वेगळ्याच अडचणी निर्माण झाल्या आहेत. त्या म्हणजे मुलांना कपडे तोडकी पडू लागली आहेत. याचसंदर्भातील एक व्हिडिओ सोशल नेटवर्किंगवर व्हायरल होत असल्याचे वृत्त ‘डेली मेल’ने दिलं आहे.

चीनमधील वुहानमधून जगभरामध्ये करोनाचा प्रादुर्भाव झाला आहे. जगातील १८० हून अधिक देशांना करोनाचा फटका बसला आहे. असं असतानाच चीन मात्र आता करोनाच्या साथीमधून सावरताना दिसत आहे. काही आठवड्यांपूर्वीच चीनमधील करोना उद्रेकाचे केंद्र असणाऱ्या वुहानमध्ये सार्वजनिक सेवा सुरु करण्यात आल्या आहेत. चीनमधील अनेक भागांमध्ये करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी बंद असणाऱ्या शाळाही सुरु झाल्या आहेत. चीनमधील काही भागांमध्ये फेब्रुवारीपासून शाळा बंद होत्या. त्या आता सुरु झाल्या आहेत. मात्र लॉकडाउनच्या काळात घरीच बसून असणाऱ्या अनेक मुलांची वजनं वाढली आहेत. त्यामुळे अशा मुलांना आता शाळेत जाण्यापूर्वी कपडे घालताना मोठी कसरत करावी लागत आहे.

वाढलेलं आकारमान जुन्या कपड्यांमध्ये पुरवताना पालकांनाही कष्ट घ्यावे लागत आहेत. अशाच एका पाच वर्षांच्या विद्यार्थ्याचा व्हिडिओ सोशल नेटवर्किंगवर धुमाकूळ घालत आहे. हा मुलगा लॉकडाउनपुर्वी अगदी सामान्य शरीरयष्टीचा होता. मात्र आता त्याचे वजन ५० किलोपर्यंत वाढले आहे. त्यामुळेच त्याला शाळेचे जुने कपडे घातला येत नाहीयत. त्याची आजी त्याला कपडे घालून देण्याचा प्रयत्न करताना व्हिडिओमध्ये दिसत आहे. शर्टाची बटणं लावण्यासाठी या मुलाला श्वास रोखून धरावा लागत आहे. ही कसरत करताना मुलाने दिलेले एक्सप्रेशन आणि विचारही न केलेली ही अडचण सध्या सोशल मिडियावर चर्चेचा विषय ठरतेय. तुम्हीच पाहा हा व्हायरल झालेला व्हिडिओ.

अनेकांनी या व्हिडिओखाली मजेदार कमेंटस केल्या असून मुलाच्या चेहऱ्यावरील हावभाव खूपच गोंडस असल्याचे म्हटले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 12, 2020 5:28 pm

Web Title: viral video boy struggles to fit into school uniform after gaining lockdown weight scsg 91
Next Stories
1 तू ‘चाल’ गड्या तुला रे भीती कशाची… १०३ वर्षांच्या करोनायोद्ध्याची आगळीवेगळी मदत
2 लागली पैज?… ‘या’ फोटोत मांजर शोधताना भले भले थकले; तुम्हाला सापडतेय का पाहा बरं
3 प्रत्येक जीवाची किंमत मुलाला कळायला हवी, गाईंना भरवायला शिखर मुलासह रस्त्यावर
Just Now!
X