करोना आणि लॉकडाउनमुळे देश आर्थिक संकटातून जात असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आत्मनिर्भर भारताचा नारा दिला. त्यामुळे देशात मागील काही महिन्यांपासून आत्मनिर्भरतेचा चर्चा होताना दिसत आहेत. सोशल मीडियामध्येही आत्मनिर्भरतेवरून व्यंगात्मक चर्चा झडताना दिसत आहेत. अशातच एका मांजरीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओनं बघणारांचं लक्षचं वेधून घेतलं आहे.

देशात सगळीकडे आत्मनिर्भरतेची चर्चा सुरू असतानाच हा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. विशेष व्हिडीओमध्ये मांजरीनं तहान लागल्यानंतर जी कृती केली, त्यावरून मांजरही आत्मनिर्भर होण्याचा प्रयत्न करतेय असंच दिसत आहे.

तहान लागलेली मांजर घरातील अॅक्वा कुलरजवळ उभी आहे. त्यानंतर दोन पायांवर उभं राहून मांजर अॅक्वाचा नळ सुरू करते आणि पाणी पिते. त्यानंतर नळ बंद करायलाही मांजर विसरत नाही. हा व्हिडीओ बघून तुम्हीही काही वेळ हातातलं काम विसराल, असाच हा व्हिडीओ आहे.

मांजरीनं केलेली ही कृती सोशल मीडियावर अनेकांना भावली आहे. त्यावर भन्नाट प्रतिक्रियाही लोक देत आहेत. आतापर्यंत हा व्हिडीओ २८ हजारांहून अधिक लोकांनी पाहिला आहे. तर दीड हजारांहून लोकांनी व्हिडीओ लाईक केला आहे. व्हिडीओ शेअर करणाऱ्यांची संख्याही मोठी आहे.