News Flash

हत्तीच्या पिलाचा ‘हा’ व्हिडिओ पाहून तुम्हालाही लहानपण आठवेल

फुलपाखरासोबत खेळणाऱ्या हत्तीच्या पिलाचा व्हिडीओ व्हायरल

रंगबेरंगी फुलपाखरं सगळ्यांचंच लक्ष वेधून घेतात. अगदी लहानग्यांपासून आबालवृद्धांना फुलपाखरांचे आकर्षण असते. बागेत भिरभिरणाऱ्या फुलपाखरांच्या मागे धावणे हा तर सर्वच लहान मुलांचा आवडता छंद. लहानच काय तर मोठ्यांनाही या रंगीबेरंगी, आकर्षक फुलपाखरांचे निरीक्षण करण्याचा मोह आवरता येत नाही. फुलपाखरु पाहिल्यानंतर प्रत्येकातील बालपण जागं होतं. असाच काहीसा प्रत्यय हत्तीच्या पिलाबाबतही आला आहे.

हत्तीचे लहान पिलू चक्क फुलपाखरासोबत खेळण्यात मग्न असल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा व्हिडिओ पाहून अनेकांना आपलं लहानपण आठवलं आहे. कित्येक नेटकऱ्यांनी तशा कमेंटही केल्या आहेत.

Chasing birds & butterflies

Who has not done it as a kid?? pic.twitter.com/hi06kKIvG6
— Susanta Nanda IFS (@susantananda3) June 23, 2020

इंडियन फॉरेस्ट सर्व्हिसमध्ये अधिकारी असलेले सुसंता नंदा यांनी आपल्या ट्विटरवर हत्तीच्या पिलाचा फुलपाखराबरोबर खेळतानाचा हा व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओमध्ये हत्तीचे पिल्लू रस्त्यावर फुलपाखरामागे इकडे तिकडे धावताना दिसत आहे.

हा व्हिडीओ सोशल मीडियावर सगळीकडे व्हायरल झाला असून तो पाहताना नेटकऱ्यांना स्वतःचं लहानपण आठवत आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 28, 2020 4:03 pm

Web Title: viral video chasing birds butterflies nck 90
Next Stories
1 Video : सानियानं विचारलं बाबा काय करतात? मुलानं दिलं ‘हे’ उत्तर
2 तुमच्या घरात आहे का हा पांढरा जादुई दगड? आजारांना करतो छूमंतर
3 Video : ट्रॅक्टरवर बसून धोनी रमला ऑर्गेनिक शेतीमध्ये
Just Now!
X