News Flash

VIDEO : धुकं की धबधबा?, पाहा निसर्गाचा चक्रावून टाकणारा चमत्कार

असं दुर्मिळ दृश्य पाहिलं नसेल

‘निसर्ग’ अद्धभूत आहे! आपल्या कल्पना आणि आकलन शक्तीच्या पलिकडे तो आहे, त्यात दररोज घडणाऱ्या किमया पाहून त्याच्या ताकदीचा अंदाज बांधणं अशक्य आहे. कधी या निसर्गाचं रौद्ररुप पाहायला मिळतं तर कधी त्याचं नजरेत भरणारं सौंदर्य.

असाच मन मोहून टाकणारा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. चीनमधल्या शेनाँनजिआमधल्या जंगलात पर्यटकांना गेल्या आठवड्यात दुर्मिळ चित्र पाहायला मिळालं. मुसळधार पाऊस कोसळल्यानंतर आकाशात धुक्याची दाट चादर तयार झाली. वाऱ्याच्या वेगामुळे धुक उंच कड्यावरून खाली वाहू लागलं, हे दृश्य इतकं अप्रतिम होतं की ही धुक्यांची चादर आहे की धबधबा याचा अंदाज बांधणं पर्यटकांना कठीण झालं. निसर्गाचा अद्धभूत चमत्कार पाहण्याची आगळी वेगळी पर्वणी यावेळी पर्यटकांना मिळाली.

अन् त्याने ब्रेकअपनंतर प्रेमाचा ‘बाजार’ मांडला

खूशखबर!; ट्विटची अक्षरमर्यादा वाढली

तब्बल चार तास निसर्गाचा हा खेळ पाहायला मिळला, त्यामुळे साहजिकच हे दुर्मिळ दृश्य कॅमेऱ्यात कैद करण्याची पुरेपूर संधी पर्यटकांना मिळाली. याचा व्हिडिओ सोशल मीडियावरही व्हायरल होत आहे जो पाहिल्यानंतर तुम्हीही निर्सगांच्या सुंदर रुपाकडे पाहून हरवून जाल हे नक्की!

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 8, 2017 11:54 am

Web Title: viral video clouds flows like waterfall in central china
Next Stories
1 खूशखबर!; ट्विटची अक्षरमर्यादा वाढली
2 अन् त्याने ब्रेकअपनंतर प्रेमाचा ‘बाजार’ मांडला
3 Viral Video : फिल्मी स्टाईलनं करायचे चोरी, चालकानं केला पर्दाफाश
Just Now!
X