जगभरातील वेगवगेळ्या देशांमधील आरोग्य कर्मचारी, नर्सेस आणि डॉक्टर करोनाच्या संकटाला धीराने तोंड देत आहे. यासाठी सर्वच स्तरातून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होताना दिसत आहे. दिवसोंदिवस करोनाबाधितांचा आकडा वाढत असतानाही सर्व डॉक्टर आणि आरोग्य कर्मचारी रुग्णांना बरं करण्यासाठी रात्रंदिवस झटताना दिसत आहेत. त्यातच करोनाचा संसर्ग होऊ नये म्हणून अनेक तास या कर्मचाऱ्यांना पीपीईमध्ये (पर्सनल प्रोटेक्टीव्ह इक्विपमेंट) राहूनच रुग्णांवर उपचार करावे लागतात. सतत पीपीई कीटमध्ये असल्याने डॉक्टरांचा चेहरा रुग्णांना दिसत नाही आणि दुसरीकडे डॉक्टरही बंदिस्त पीपीई कीटमध्ये घामाने भिजलेले असतात. त्यामुळेच डॉक्टर आणि करोना रुग्णांमध्ये हावभावातून संवाद होण्यास अडथळा निर्माण होतो. करोनाचा संसर्ग झाल्याने आधीच तणावाखाली असणाऱ्या रुग्णांना कोणाशीही थेट संपर्क साधला येत नाही. म्हणूनच आसाममधील एका करोना केंद्रातील डॉक्टरने रुग्णांचे मनोरंजन करण्यासाठी चक्क पीपीई कीट घालून ब्रेक डान्स केला. या डान्सचा व्हिडीओ सध्या व्हायरल झाला आहे. शिवसेनेच्या राज्यसभेच्या खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनीही ट्विटरवरुन हा व्हिडिओ शेअर केला आहे.

डॉक्टर सय्यद फैझान अहमद यांनी १८ ऑक्टोबर रोजी ट्विटरवरुन आपल्या सहकाऱ्याच्या ब्रेक डान्सचा व्हिडीओ शेअर केला होता. “हा आहे माझा सहकारी डॉ. अरुप सेनापती. तो आसाममधील सिल्चर मेडीकल कॉलेजमध्ये ईएनटी सर्जन आहे. करोनाच्या काळामध्ये रुग्णांचे मनोरंजन करण्यासाठी त्याने केला डान्स पाहा,” अशी कॅप्शन देत अहमद यांनी अरुप यांचा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत डॉक्टर अरुप हे ‘वॉर’ चित्रपटामध्ये अभिनेता हृतिक रोशनवर चित्रित करण्यात आलेल्या ‘घुंगरु तूट गये’ गाण्यावर नाचताना दिसत आहेत. पीपीई कीट घालूनही डॉ. अरुप यांच्या स्टेप्स एखाद्या डान्सरलाही लाजवतील इतक्या परफेक्ट असल्याचे व्हिडीओत दिसत आहे.

हा व्हिडीओ सोशल नेटवर्किंगवर प्रचंड व्हायरल झाला असून दो दिवसांमध्ये हे ट्विट सात हजारहून अधिक जणांनी शेअर केलं आहे. तर पाच लाखांहून अधिक व्ह्यू या व्हिडीओला मिळाले आहेत. शिवसेनेच्या खासदार प्रियंका चतुर्वेदींनीही हा व्हिडीओ शेअर केला असून, “मी हा व्हिडीओ दिवसभऱ बघू शकते. तुमचा डान्स आणि त्यामागील निमित्त छान आहे डॉ. अरुप सेनापती,” अशी कमेंटही दिली आहे.

करोनायोद्धे असणारे डॉक्टर्स स्वत:चा जीव धोक्यात घालून हसत हसत रुग्ण सेवा करताना दिसत आहेत. याच डॉक्टरांना सलाम करण्यासाठी जुलै महिन्यात डॉक्टर्स डेच्या निमित्ताने मुंबईमधील रिचा नेगी या महिला डॉक्टरनेच ब्रेक डान्स करत अनोख्या पद्धतीने धन्यवाद म्हटलं होतं हा व्हिडिओही प्रचंड व्हायरल झाला होता.

पीपीई कीटमध्ये डॉक्टरांना गरम होतं यावरुन या तरुण डॉक्टरने ‘हाय गर्मी’ गाण्यावर डान्स केला होता.”जरी आम्ही स्वत: या गर्मी होणाऱ्या मात्र तितक्याच सुंदर दिसणाऱ्या पोशाखामध्ये असतो तरी सध्याच्या परिस्थितीमध्ये नकारात्मकतेला आम्ही दूर ठेवण्याचा प्रयत्न करतोय. आम्ही आमचा जीव धोक्यात घालून सकारात्मक राहू शकतो. तर तुम्हीही या वाढवलेल्या लॉकडाउनच्या कालावधीमध्ये थोडं सकारात्मक राहणं गरजेचं आहे,” असं रिचा या पोस्टमध्ये म्हणते. डॉक्टर्स डे आणि १ जुलैपासून महाराष्ट्रामध्ये महिनाभरासाठी वाढलेल्या लॉकडाउनची सांगड घालत रिचाने सर्व सामान्यांना या गोष्टींकडे सकारात्मक नजरेतून पाहा असं आवाहन केलं आहे.

नक्की वाचा >> …म्हणून या करोना केअर सेंटरवरील कर्मचारी PPE वर स्वत:चे हसरे फोटो लावून करतात रुग्णसेवा

रिचाने पोस्ट केलेल्या व्हिडिओमध्ये ती पीपीई कीट घालून ‘स्ट्रीट डान्सर’ या चित्रपटातील ‘हाय गर्मी’ या गाण्यावर नाचताना दिसत आहे.

 

View this post on Instagram

 

We Won’t Let The Negativity Of The Situation Get To Us Even While Serving The Patients In This GARMI-ful But Oh So Graceful Outfit. HAPPY DOCTOR’s DAY To All My Colleagues & The FrontLine Workers Out There Putting Up A Brave Smile In The Face Of This Adversity & Doing Their Best To Help The Nation . If We Can Stay Positive Through Risking Our Lives, Y’all Can Be A Lil Positive Too About This Extended Lockdown.! Stay Home Peepz . Always Loved The Vibe Of This Song But Now That It Clearly Matches The Feeling of Every Doctor Wearing The PPE KIT, (haaye garmi).! I Couldn’t Stop From Making A Video On It . @norafatehi @varundvn @badboyshah You Guys Were So Amazing In ThisIf Only I Could Match Up To Half Of What These Guys Do Everyday @dharmesh0011 @raghavjuyal @remodsouza @rahuldid @sushi1983 @suresh_kingsunited @shraddhakapoor @moonlight_chandni @iamkrutimahesh @punitjpathakofficial @perysheetal17 . . PS: I Feel Like A TellyTubbie On A Mission.! . Also Thankyouuu @adityabhansali_ for editing this & @rajkeralia97 for helping me with this.! . . #dance #dancer #choreography #love #norafatehi #doctorsday #instagood #instagram #bollywood

A post shared by Richa (@dr.richa.negi) on

नक्की वाचा >> पारदर्शक PPE किटमध्ये लाँजरी घालून उपचार करणारी नर्स झाली मॉडेल; नोकरीही मिळाली परत

अभिनेता वरुण धवनही पडला प्रेमात

अनेकांनी तिचा डान्स पाहून तू खरोखर खूप सुंदर नाचते अशी प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नोंदवली आहे. हाय गर्मी या मूळ गाण्यात थिरकलेला अभिनेता वरुन धवननेही या पोस्टवर कमेंट केली असून त्याने फायर आणि हार्टचा इमोन्जी पोस्ट करत रिचाचे कौतुक केलं आहे.

या व्हिडीओबरोबरच आणखीनही काही व्हिडीओ सोशल नेटवर्किंगवर व्हायरल झाल्याचे मागील काही महिन्यात पाहायला मिळालं आहे.