जगाभरात करोना विषाणूने धुमाकूळ घातला आहे. दररोज करोनाच्या रुग्णांमध्ये वाढ होत आहे. करोनाच्या या कठीण प्रसंगात डॉक्टर आपल्या जीवाची बाजी लावून रग्णांना वाचण्याचं काम करत आहेत. रुग्णांना सेवा देताना डॉक्टर स्वत: तणावात आहेत. मात्र तरीही आपल्या रुग्णाच्या चेहऱ्यावर हसू आणण्याचा प्रयत्न ते करतात. त्यासाठी डॉक्टर शक्य ते प्रयत्न करतात. सध्या असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे, ज्यामध्ये करोना रुग्णांची सेवा करणारा एक डॉक्टर आपल्या रुग्णासाठी गाणं म्हटलाय….

इराकमधील हा व्हिडीओ असून रुग्णासाठी डॉक्टराने गाणं गायलं आहे. डॉक्टराच्या कर्तव्याचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. khalo atheer या युझर्सने हा व्हिडीओ आपल्या ट्विटर खात्यावर शेअर केला आहे. जवळपास एक मिनिटाच्या या व्हिडीओमध्ये डॉक्टरानं गायलेलं आणि त्याचं कर्तव्य दिसून येतं. या व्हिडीओमध्ये एका वयोवृद्ध महिला आहे, जिला करोनाची लागण झाली आहे. तिच्यासाठी डॉक्टर गाताना दिसतो आहे.

व्हिडीओचा शेवटचा क्षण पाहाल तर तुमच्या डोळ्यात चटकन पाणीच येईल. आपल्या आईच्या डोक्यावर जसं आपण प्रेमानं चुंबन घ्यावं, तसंच या डॉक्टरनंही घेतलं आहे. यानंतर मात्र या महिलेला आपल्या अश्रूंना आवर घालता आला नाही.