देशभरातील अनेक राज्यांमधील रुग्णालयांमध्ये ऑक्सिजन, बेड आणि व्हेंटिलेटर्सची कमतरता जाणवत आहे. करोनाची दुसरी लाट ही पहिल्या लाटेपेक्षा अधिक धोकादायक असल्याचं चित्र रुग्णसंख्या वाढीवरुन यापूर्वीच स्पष्ट झालं आहे. मंगळवारी देशात करोनाचे २ लाख ९४ हजार रुग्ण आढळून आले आहे. तर पहिल्यांदाच देशात एका दिवसात दोन हजारांहून अधिक जणांचा करोनामुळे मृत्यू झालाय. महाराष्ट्र आणि दिल्लीमध्ये करोनाचा प्रादुर्भाव मोठ्या वेगाने होताना दिसत आहे. या दोन्ही राज्यांमधील परिस्थिती चिंताजनक आहे. देशाची आर्थिक राजधानी असणाऱ्या मुंबईमधील आरोग्य सुविधांवर करोना रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे कमालीचा ताण पडताना दिसत आहे. करोना रुग्णांच्या नातेवाईकांना औषधे, बेड्स आणि ऑक्सिजनसाठी धावपळ करावी लागत आहे. अनेक ठिकाणी परिस्थिती हाताबाहेर गेल्याचं चित्र दिसत आहे. असं असतानाच मुंबईतील संसर्गजन्य रोगांच्या तज्ज्ञ असणाऱ्या डॉक्टर तृप्ती गिलाड यांचा एक व्हिडीओ सोशल मिडीयावर प्रचंड व्हायरल होताना दिसत आहे. अनेक अकाऊंटवरुन हा व्हिडीओ शेअर करण्यात आलाय.

या व्हिडीओमध्ये डॉ. तृप्ती करोना परिस्थितीसंदर्भात बोलताना अचानक रडू लागल्याचं दिसत आहे. “अनेक डॉक्टरांप्रमाणे मी सुद्धा चिंतेत आहे. परिस्थिती चिंताजनक आहे. इथे आयसीयूमध्ये आता जागा शिल्लक नाहीयत. यापूर्वी आम्ही डॉक्टरांनी अशी परिस्थिती कधीच पाहिली नाही. आम्ही काहीच करु शकत नाहीय. सध्याच्या परिस्थितीमुळे आम्हा डॉक्टरांना अनेकदा इमोशन ब्रेकडाऊनचा (अचानक रडू येणं) सामना करावा लागतोय. परिस्थिती गंभीर आहे. त्यामुळेच स्वत:ची काळजी घ्या आणि स्वत:ला सुरक्षित ठेवा,” असं डॉ. तृप्ती व्हिडीओ सांगतात.

karma hit back on young boys who messed with the cow
Video : गायींबरोबर पंगा घेणे तरुणाला पडले चांगलेच महागात, थेट हवेत उडवले अन्…, व्हिडीओ होतोय व्हायरल
Pakistani man receive a gift of ancestral home door from India
याला म्हणतात मैत्री! पाकिस्तानी मित्राला पाठवला घराचा दरवाजा, १९४७ च्या फाळणीनंतर पहिल्यांदा दरवाजा पाहून…; व्हिडीओ होतोय व्हायरल
nature-loving rickshaw driver put Plants in rickshaw
“किती सुंदर दादा!”, निसर्गप्रेमी रिक्षचालकाचा हटके जुगाड पाहून प्रवासी झाले खुश, व्हायरल व्हिडीओ एकदा बघाच
mundu-clad gang boys dance on lungi shirt
Video : लुंगी शर्टवर तरुणांनी केला झकास डान्स, डान्स स्टेप्स एकदा पाहाच, व्हिडीओ होतोय व्हायरल

“मागील वर्षभराच्या कालावधीमध्ये तुम्हाला करोनाचा संसर्ग नाही झालाय तर तुम्ही स्वत:ला सुपरहिरो समजू नका. तुमची रोगप्रतिकारशक्ती खूप आहे असं तुम्हाला वाटत असेल तर हा तुमचा गैरसमज आहे. आज आमच्यासमोर ३५ वर्षीय वयाचे लोकं व्हेंटिलेटवर आहेत. त्यांची प्रकृती चिंताजनक आहे,” असंही डॉ. तृप्ती या व्हिडीओत सांगताना दिसतं.

“यापूर्वी डॉक्टरांनीही असा काळ कधी पाहिली नव्हता तेव्हा एवढ्या रुग्णांना एकाच वेळी हाताळावं लागत आहे. ज्यांना दाखल करुन घेता आलं नाही त्यांना आम्ही घरी ऑक्सिजन पुरवठा करत परिस्थिती हाताळत आहोत. ज्या लोकांनी लसीचे दोन्ही डोस घेतले आहेत त्यांच्यामध्ये गंभीर संसर्ग झाल्याचं फार कमी दिसून येत आहे. लस घेतलेल्यांना रुग्णालयात दाखल करण्याचं प्रमाण जवळजवळ शून्य आहे. लसीमुळे या विषाणुशी लढण्यास मदत होत आहे हे स्पष्ट आहे,” असंही डॉ. तृप्ती यांनी म्हटलंय. तसेच तरुण मुलांनी संसर्ग झाल्यानंतर घाबरुन थेट रुग्णालयात दाखल होण्याची घाई करु नये असं आवाहन तृप्ती यांनी केलं आहे. अनेक ठिकाणी प्रकृती स्थिर असणारे रुग्ण रुग्णालयात दाखल असल्याने उपचारांची गरज असणाऱ्यांना बेड मिळत नाहीय, असं तृप्ती यांनी म्हटलं आहे.

परिस्थितीबद्दल भाष्य करताना डोळ्यातून येणारं पाणी पुसतच डॉ. तृप्ती यांनी, “डॉक्टरांनाही इमोशनल ब्रेकडाऊनचा सामाना करावा लागत आहे. त्यामुळेच स्वत:ची काळजी घ्या,” असं सांगतात. करोना तुमच्या आजूबाजूला सगळीकडे आहे, त्यामुळे घरातून बाहेर पडताना मास्क घालूनच बाहेर पडा. तुम्हाला यापूर्वी करोना होऊन गेला असेल तरी पुन्हा संसर्ग होण्याची शक्यता नाकारता येत नाही म्हणून मास्क घालूनच बाहेर पडत जा. तुम्ही फक्त इतकच करा काही काही आठवडे घरातच थांबा. असं झाल्यास अशी वेळ येईल की किमान रुग्णांना दाखल करण्यासाठी रुग्णालयात बेड तरी उपलब्ध असतील, असंही तृप्ती यांनी म्हटलं आहे.

सर्व आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी प्रार्थना करा कारण त्यांना तुमच्या शुभेच्छांची आणि सद्इच्छांची गरज आहे, असंही व्हिडीओच्या शेवटी डॉ. तृप्ती यांनी सांगितलं आहे.