लग्नसोहळा म्हणजे विधी, कार्यक्रम आणि मानपानाची धावपळ… पण एकूणच सगळं उत्साहाचं वातावरण असल्याने हा ताण अगदीच निवळून जातो. हल्ली लग्नात नवरा-नवरीच्या स्पेशल एन्ट्रीचा ट्रेंड बनत चालला आहे. नवरा-नवरी दोघांच्या आयुष्यातील या क्षणांना आणखी खास बनवण्यासाठी वेगवेगळ्या आयडिया वापरतात. अशाच एका लग्नाचा व्हिडीओ सध्या इंटरनेटवर चर्चेत आला आहे. या व्हिडीओमध्ये आपल्या होणाऱ्या बायकोसाठी नवऱ्याने अफलातून भांगडा डान्स केला आहे.

आपल्या सर्वांना हे माहिती आहे, की लग्नात सर्वांचं लक्ष हे नवरी अन् नवरदेवाकडेच असतं. लग्नसमारंभात गाणी आणि डान्स यामुळे कार्यक्रमाची शोभा आणखीच वाढते. आजकाल नवरदेव आणि नवरीदेखील स्वतःच्या लग्नात डान्स करताना दिसतात. सध्या अशाच एका नवरदेवाचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, की एक नवरदेव आपल्याच लग्नात बिनधास्त भांगडा डान्स करत आहे. नवरदेवाचा हा भांगडा डान्स पाहून सगळेच हैराण झाले आहेत.

या व्हिडीओमध्ये आपल्या बायकोला नवरीच्या लूकमध्ये प्रवेश करताना पाहून नवरदेवाला आपला उत्साह लपवता आला नाही. तिच्या स्वागतासाठी ढोलाच्या तालावर नाचू लागला. तसंच आपल्या अनोख्या स्टाइलने त्याच्या आयुष्यात येणाऱ्या बायकोचं हटके पद्धतीने स्वागत केलं. या व्हिडीओमध्ये नवरदेवाने भांगडा डान्स करत नवरीकडे येतो आणि तिला मिठी मारत आपल्या आयुष्यात तिचं अनोखं स्वागत करतो.
नवरदेवाचा हा अंदाज पाहून नवरी सुद्धा लाजते. नवरदेवाचं हे सरप्राईज पाहून हॉलमधील सर्वांच्या चेहऱ्यावर स्माइल आल्याशिवाय राहत नाही. हा व्हिडीओ पाहून प्रत्येकाच्या तोंडी ‘ओह्ह’ असे उद्गार येतात. नवरदेवाचा हा बिनधास्त भांगडा डान्स सोशल मीडियावर बराच व्हायरल होतोय. अनेकजण या व्हिडीओवर कमेंट करत दोघांमधील बॉण्डींगचं कौतुक करत आहेत.


एका यूजरनं लिहिलं, की नवरदेवाचा असा डान्स मी पहिल्यांदाच पाहिला आहे. तर दुसऱ्या एका यूजरनं लिहिलं, की आतापर्यंतचा सर्वात जबरदस्त परफॉर्मन्स. याशिवाय इतरही अनेकांनी कमेंट करत नवरदेवाच्या डान्सचं कौतुक केलं आहे. हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर ‘thechopraevents’ नावाच्या अकाऊंटवरुन शेअर केला गेला आहे. या व्हिडीओवर आतापर्यंत ९९ हजार पेक्षा जास्त लोकांनी कमेंट्स केले आहेत.