News Flash

Viral Video : सिंहिणीची डरकाळी ऐकून घाबरला सिंह, नेटकरी म्हणतात…’राजा होगा अपने घर में…’

"तुम्ही जंगलाचा राजा असलात तरी काही फरक पडत नाही, कारण राज्य फक्त राणीच करते"

सोशल मीडियावर वन्यप्राण्यांचे व्हिडिओ मोठ्या प्रमाणात बघितले जातात. तुम्ही इंटरनेटवर सिंहाच्या शिकारीचे अनेक व्हिडिओ बघितले असतील. जंगलाचा राजा सिंह येताना दिसला की घाबरुन सगळेच प्राणी धूम ठोकतात. पण सध्या सोशल मीडियावर एक सिंह आणि सिंहिणीच्या भांडणाचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये सिंहिणीची डरकाळी ऐकून जंगलाचा राजा काही पावलं मागे हटताना दिसतो.

हा व्हिडिओ गुजरातच्या गिर जंगलातला असल्याची माहिती आहे. व्हिडिओमध्ये दूर काही अंतरावर एक सफारी जीप उभी असल्याचं दिसत आहे. त्यात पर्यटक बसलेत. रस्त्याच्या मधोमध एक सिंहीण बसलीये. सिंह तिच्याजवळ येताच ती डरकाळी फोडते आणि हल्ला करण्याचा प्रयत्न करते. सिंहदेखील तिला प्रत्युत्तर देतो, पण थोड्याच वेळात तो माघार घेतो. सिंहासमोर न घाबरता त्याला भिडणाऱ्या या सिंहिणीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. नेटकरी सिंह आणि सिंहिणीच्या या भांडणाची तुलना नवऱ्या बायकोच्या भांडणाशी करत असून मजेशीर कॅप्शन देत हा व्हिडिओ शेअर करत आहेत. ‘राजघराण्यात असो किंवा सामान्य आयुष्यात, नवरा बायकोची भांडणं सगळीकडे सारखीच असतात’, अशा प्रतिक्रिया नेटकरी देत आहेत. तर, इंडियन फॉरेस्ट ऑफिसर प्रविण कासवान यांनीही हा व्हिडिओ शेअर केलाय. यासोबत, “तुम्ही जंगलाचा राजा असलात तरी काही फरक पडत नाही, कारण राज्य फक्त राणीच करते”, असं कॅप्शन दिलं आहे.

पाहा व्हिडिओ आणि एक नजर मारुया नेटकऱ्यांच्या काही प्रतिक्रियांवर –

हा व्हिडिओ सर्वात आधी ‘वाइल्ड इंडिया’ने “गिरच्या जंगलातला हा शानदार व्हिडिओ हेडफोन लावून नक्की बघा” अशा कॅप्शनसह शेअर केला. 26 जुलैला शेअर करण्यात आलेला हा व्हिडिओ आतापर्यंत दोन लाखांहून जास्त जणांनी बघितला असून त्यावर मजेशीर प्रतिक्रिया येत आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 27, 2020 1:48 pm

Web Title: viral video fight between lion and lioness triggers hilarious husband wife jokes sas 89
Next Stories
1 त्या व्हायरल व्हिडिओवर आनंद महिंद्रांची प्रतिक्रिया; म्हणाले, “बोलेरोकडे बघून असं वाटतं आहे की…”
2 एका दिवसात एवढ्या लसी तयार करू की…; पाहा काय म्हणाले अदर पूनावाला
3 कमालच झाली राव… चक्क हत्ती करतोय तेल लावून मालकाची मालिश; व्हिडीओ नेटकऱ्यांना भावला
Just Now!
X