महाविकास आघाडीमधील वनमंत्री आणि यवतमाळचे पालकमंत्री संजय राठोड यांनी पत्नीसोबत कुटुंबातील एका कार्यक्रमात गाण्यावर ठेका धराला. आपल्या व्यस्त राजकीय कार्यक्रमातून वेळ काढून संजय राठोड यांनी पत्नीसह लग्नामध्ये हजेरी लावली. यावेळी त्यांनी एका रोमँटिक गाण्यावर पत्नीसह ठेकाही धरला. संजय राठोड यांचा डान्स करतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.
राठोड यांच्या कुटुंबात विवाह समारंभाचे आयोजन आहे. त्यानिमित्त कौटुंबिक संगीत समारोहचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी पालकमंत्री संजय राठोड आणि त्यांची पत्नी शीतल राठोड आवर्जून उपस्थित होते. लग्नसोहळ्यातील संगीत समारंभात संजय राठोड यांनी पत्नीसह ‘किसी दिन बनोगी…’ या हिंदी गाण्यावर ठेका धरला. राठोड दाम्पत्यांचा डान्स पाहून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला.
राठोड यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on December 27, 2020 2:31 pm