राज्यातील लॉकडाउनचे नियम शिथिल करण्यात आले असून अर्थचक्राला गती देण्यासाठी अनेक महत्वाचे निर्णय मागील काही आठवड्यांमध्ये घेण्यात आले आहेत. त्यामुळेच आता हळूहळू लोकं कामासाठी घराबाहेर पडू लागले आहेत. मात्र अनेक ंकंपन्यांचे कर्मचारी घरुनच काम करत असल्याने रस्त्यावर नेहमीच्या तुलनेत तशी कमीच गर्दी आणि वर्दळ दिसून येत आहे. मात्र सध्या सोशल नेटवर्किंगवर व्हायरल होत असलेल्या एका व्हिडिओमध्ये याच निवांतपणाची झलक पहायला मिळत आहे. व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये एक महिला दुचाकीस्वार सिग्नलवर चक्क नेलपॉलिश लावताना दिसत आहे.

नक्की पाहा >> Viral Video : शिकार करण्यासाठी बिबट्याने थेट दरीमध्ये मारली उडी अन्…

आनंद इंगळे यांनी हा व्हिडिओ ट्विटवरुन शेअऱ केला आहे. या ४० सेकंदांच्या व्हिडिओमध्ये एका सिग्नलला महिला दुचाकीस्वार थांबल्याचे दिसत आहे. सामान्यपणे सिग्नलला थांबल्यावर तो पुन्हा हिरवा होईपर्यंत इकडे तिकडे पाहणे, आरशात डोकावणे अशा गोष्टी अनेकजण करताना दिसतात. मात्र या व्हिडिओतील माहिला आपल्या डाव्या खांद्याला लावलेल्या पर्समधून नेलपेंट काढून ती लावताना दिसत आहे. हा व्हिडिओ कोणत्या सिग्नलवर शूट करण्यात आला आहे, ही महिला कोण आहे यासंदर्भातील कोणताही माहिती समोर आलेली नाही. तरी या व्हिडिओमधील महिला तोंडावर मास्क लावून असल्याने हा व्हिडिओ आताचाच असल्याचे स्पष्ट होतं आहे. व्हिडिओमध्ये नेलपेंट लावून झाल्यानंतर सिग्नल सुरु होण्याच्या काही सेकंद आधी ही महिला नेलपेंट पुन्हा पर्समध्ये ठेऊन चावीने गाडी सुरु करताना दिसत आहे.

या ट्विटवर लोकांनी मजेदार प्रतिक्रिया दिल्या आहेत. काहींना याला वेळेचा सद्उपयोग असं म्हटलं आहे तर काहींनी या अशाच लहान लहान गोष्टींमुळे लोकं मुंबईच्या आणि मुंबईकरांच्या प्रेमात असतात असं म्हटलं आहे. तर एकाने ही महिला नक्कीच वर्किंग वूमन असणार जी ऑफिसला जातानाच अशापद्धतीने वेळाचा योग्य वापरु करुन तायर होत आहे अशी कमेंट केली आहे.