सोशल मीडियावर सध्या एका धाडसी महिलेचे खुप कौतुक होताना दिसत आहे. या महिलेने प्रसंगवधान दाखवून आत्महत्या करणाऱ्या एका व्यक्तीचे प्राण वाचवले आहेत. घडलेली संपूर्ण घटना रेल्वे स्थानकावरील सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे.  काळजाचा ठोका चुकवणारा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सध्या नेटकऱ्यांमध्ये चर्चा असणारा आणि व्हायरल झालेला हा व्हिडिओ अवघ्या ५ सेकंदांचा आहे. या व्हिडिओमध्ये प्लॅटफॉर्मवर बसलेली व्यक्ती ट्रेन येताना पाहून अचानक उठते आणि रुळांवर उडी मारण्यासाठी जाताना दिसते. तितक्यात त्या व्यक्तीच्या बाजूला असणारी ही महिला त्याला खेचून प्लॅटफॉर्मच्या दिशेने ढकलते. ही घटना दक्षिण इंग्लंडमधील एका रेल्वे स्थानकावरील असल्याची माहिती समोर येत आहे.

या महिलेवर कौतुकाचा वर्षावर होत असला तरी पोलिसांना या व्हिडिओच्या विश्वासार्हतेबद्दल प्रश्न उपस्थित केला आहे. आत्महत्या करण्यासाठी जाणारी व्यक्ती ही तणावात असल्याचे समजते. गाडी येण्याआधी फोनवर बोलत असताना गाडी आल्यावर अचानक ती व्यक्ती गाडीसमोर उभी मारण्यास जाताना दिसते.

या व्हिडिओवर सोशल नेटवर्किंगवर अनेक प्रतिक्रिया येत आहेत. एका नेटकऱ्याने या व्हिडिओबद्दल म्हटले आहे की, या रेल्वे कंपनीत काम करणारा मोटरमन म्हणून मी या महिलेचे आभार मानतो.  तर दुसऱ्या व्यक्तीने व्हिडिओच्या सत्यतेबाबतच प्रश्न उपस्थित करत ही घटना ज्या स्थानकावरील असल्याचे सांगितले जात आहे तिथे सीसीटीव्हीच नाहीत असे म्हणत हा व्हिडिओच खोटा ठरवला आहे.

आम्ही नेहमीच प्रत्येक प्रवाशांनी एकमेकांना मदत करावी यासाठी  प्रयत्नशील असल्याचे रेल्वे प्रशासनाच्या प्रवक्त्यांनी सांगितले. प्रवाशांनी अडचणीत असलेल्या सहप्रवाशांना जरुर मदत करावी आणि मदत करणे शक्य नसल्यास पोलिसांना फोन करुन मदत मागावी असेही रेल्वेच्या प्रवक्त्यांनी सांगितले.

पाहा या घटनेचा व्हायरल होत असलेला व्हिडिओ

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Viral video heroic woman filmed running to save a commuter but police say might be fake
First published on: 19-01-2018 at 13:28 IST