News Flash

Viral Video: जिलेबी आणि इमरती बनवणारी मशीन पाहून थक्क व्हाल

सोशल मीडियावर या व्हिडीओची चर्चा

फोटो सौजन्य: सोशल नेटवर्किंग

काही पदार्थाचं एखाद्या सणाशी वा समारंभाशी नातं का जोडलं जातं? तुम्हाला हा प्रश्न कधी पडतो का? म्हणजे एक काळ असा होता की, लग्नसमारंभ आणि जिलेबी यांचं नातं अतूट होतं. लग्नाच्या पंगतीत जिलेबीचा आग्रह करणाऱ्या जोडप्यांचे फोटो आजही अनेकांच्या संग्रही असतील. जिलेबी असो किंवा इमरती या दोन्ही गोड गोष्टी अनेकांसाठी आजही जीव की प्राण आहे. या दोन्ही गोष्टी कधीच आऊट डेटेड होत नाही असं गोड खाणारे आवर्जून सांगतात. पण या गोष्टींच जितकं कौतुक केलं जातं तितकेच कष्ट या बनवायलाही घ्यावं लागतं. मात्र यावरच कोणीतरी एक भन्नाट उपाय शोधून काढला आहे. सध्या याच जुगाडची सोशल नेटवर्किंगवर मोठी चर्चा आहे. चर्चेत असणारी ही गोष्ट म्हणजे इमरती बनवणारी मशीन.

सामान्यपणे अगदी फाइव्ह सरकार हॉटेलमध्येही जिलेबी आणि इमरती हातानेच पाडली जाते. रुमाला एवढ्या कापडाच्या गाठोड्याच्या मदतीने जिलेबी पाडणारे स्वयंपाके तुम्ही गावांमधील जत्रेत पाहिले असतील. मात्र आता जिलेबी पाडणा-या मशिनचा शोध कोणीतरी लावला असून भूषण ग्यान नावाच्या ट्विटर अकाऊंटवरुन हा व्हिडिओ शेअर करण्यात आलाय.

विशेष म्हणजे हा व्हिडीओ एखाद्या मोठ्या हॉटेलमधील असल्याचे पाहता क्षणीच समजते. परदेशातील मोठ्या कारखान्यांमध्या ज्या प्रकारे पुर्णपणे स्वयंचलित यंत्रांच्या मदतीने पदार्थ बनवले जातात तशीच ही इमरती बनवली जात आहे. चार पाईपमधून इमरती चार टी कोस्टरच्या आकाराच्या प्लॅटफॉर्मवर तयार केल्या जातात. मग ते प्लॅटफॉर्म खाली सरकतात आणि इमरती उकळत्या तेलात सोडली जाते. एका बाजूच्या चार इमरती होईपर्यंत मशीन दुस-या बाजूला याच पद्धतीने एकाच वेळी चार इमरती तयार केल्या जातात.

एकंदरितच या व्हिडीओची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा असल्याचे चित्र दिसत आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 20, 2020 7:24 pm

Web Title: viral video imriti jalebi making machine scsg 91
Next Stories
1 Viral Video: ‘या’ साडीच्या दुकानात करोनालाही शिरायला जागा नाही
2 भावाला का मारलं? आईला मुलगी समजावतानाचा व्हिडीओ तुफान व्हायरल
3 याला म्हणतात Dream Job : बिस्किट खाण्यासाठी महिन्याला मिळणार ३ लाख ३३ हजार पगार
Just Now!
X