17 July 2019

News Flash

Viral Video: ‘सर, जिओ चल नही राहा’, फोटोग्राफरची थेट मुकेश अंबानींकडे तक्रार

दिपिका आणि रणवीर यांच्या रिसेप्शन सोहळ्यादरम्यानचा व्हिडीओ व्हायरल

अनिल अंबानींकडे केली तक्रार

दिपिका आणि रणवीर यांनी आपल्या लग्नानंतर बॉलिवूडमधील मित्रमैत्रिणींसाठी आयोजित केलेले रिसेप्शन १ डिसेंबर रोजी मुंबईमध्ये पार पडले. या रिसेप्शनला बॉलिवूड तसेच उद्योग जगतामधील अनेक दिग्गजांनी आवर्जून उपस्थिती लावली. यामध्ये भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आणि रिलायन्सचे अध्यक्ष मुकेश अंबानी आणि त्यांच्या कुटुंबियांचाही समावेश होता. पत्नी निताबरोबरच आकाश आणि अनंत या दोन्ही मुलांबरोबरच मुलगी इशासुद्धा या रिसेप्शनला उपस्थित होती. अंबानी कुटुंबियांबरोबरच त्यांची भावी सून श्लोक मेहता आणि अनंतची जवळची मैत्रिण राधिका मर्चंड यांनीही या रिसेप्शनला हजेरी लावली. रिसेप्शनला उपस्थित राहणाऱ्यांची एक झकल टिपण्यासाठी अनेक प्रासरमाध्यमांच्या प्रतिनिधींनी आणि कॅमेरामन्सची गर्दी केली होती. अशाच गर्दीसमोर आमंत्रित व्यक्ती येऊन उभे राहत होते आणि फोटो काढून झाल्यावर हॉलमध्ये प्रवेश करत होते. मात्र मुकेश अंबानी यांनी आपल्या कुटुंबियांसोबत फोटोसाठी पोज दिली आणि अचानक फोटोग्राफर्समधून एक आरोळी आली… ‘सर, जिओ चल नही राहा.’

गर्दीतील एका फोटोग्राफरने ही कमेन्ट केल्यानंतर उपस्थित फोटोग्राफर्समध्ये एकच हशा पिकला. हा सर्व प्रकार कॅमेरामध्ये कैदा झाला आहे. हा व्हिडीओ सध्या सोशल मिडियावर व्हायरल होताना दिसत आहे.

 

View this post on Instagram

 

#ambani family at #deepikapadukone #ranveersingh #weddingreception #deepveerkishaadi @viralbhayani

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani) on

भारतीय टेलिकॉम क्षेत्रामध्ये जिओने क्रांती घडवली असं म्हटलं जातं. जिओ ही मुकेश अंबानी यांच्या डोक्यातील कल्पना असून जिओमुळे इंटरनेट सेवा पुरवणाऱ्या टेलीकॉम कंपन्यांमध्ये नवीन स्पर्धा सुरु झाली. देशात सर्वात वेगवान गतीने इंटरनेट पुरवण्याच्या उद्देशाने बाजारात उतरलेल्या जिओला टक्कर देण्यासाठी इतर कंपन्यांनीही आपल्या डेटा प्लॅनमध्ये मोठे बदल करत स्वस्तात इंटरनेट उपलब्ध करुन दिले.

जिओने सेवा सुरु केल्यानंतर अनेकांनी आपल्या जुन्या मोबाईल ऑप्रेटर्सला सोडून जिओचा स्वीकार केला. मात्र असेल असले तरी जिओने सेवा सुरु केल्यापासूनच अनेक जिओ युझर्स ‘जीओ चल नही राहा’ ही तक्रार करताना दिसत आहेत. अनेकदा कस्टमर सर्व्हिसकडे तक्रार करुनही बहुदा उत्तर मिळत नसल्याने फोटोग्राफरने थेट कंपनीचे सर्वेसर्वा असणाऱ्या मुकेश अंबानींकडे अशा अनोख्याप्रकारे तक्रार केली असल्याची नेटकऱ्यांमध्ये चर्चा आहे. फोटोग्राफरने तक्रार केल्यानंतर थोडे गोंधळेले मुकेश अंबानी कॅमेराम्सकडे हात पुढे करत चालू लागले आणि तितक्यात अभिनेता संजय दत्त आल्याने त्यांनी त्याच्याशी हात मिळवत पुन्हा ते हॉलमध्ये जाऊ लागले. त्यामुळे नक्की अंबानी कशासाठी पुढे येत होते हे कळू शकले नाही तरी त्यांनी या कॅमेरामनची तक्रार नक्कीच ऐकली असेल अशी अपेक्षा सर्व जिओ युझर्स करत असावेत. आता थेट बिग बॉसकडे तक्रार केल्याने जिओच्या नेटवर्कमध्ये येणाऱ्या अडचणी दूर होतात का हे येणार काळच सांगेल.

First Published on December 3, 2018 4:50 pm

Web Title: viral video jio nahi chal raha photographer shouts while clicking mukesh ambani