सध्या देशामध्ये करोनाच्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. काही ठिकाणी रुग्णांना बेड मिळत नसल्याच्या तक्रारी समोर येत आहे. तर काही ठिकाणी लहान दवाखानेही बंद असल्याने नागरिकांची गैरसोय होत असल्याचे सांगितले जात आहे. एकीकडे आरोग्य सेवेवरील ताण वाढला असतानाच कर्नाटकमधील एक व्हिडिओ सध्या सोशल नेटवर्किंगवर चर्चेचा विषय ठरत आहे. या व्हिडिओमध्ये एका रुग्णालयामध्ये चक्क एक माकड उपचार करुन घेण्यासाठी आलेलं दिसत आहे. या माकडाचा रुग्णालयाच्या पायऱ्यांवर वाट बघतानाचा व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे.

फेसबुकवरील लेट्स गो दंडेली नावाच्या पेजवरुन ५ जून रोजी हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. कर्नाटकमध्ये दंडेली अभयारण्य असल्याने या भागामध्ये माकडांची संख्या भरपूर आहे. असेच एक जखमी झालेले माकड या व्हिडिओमध्ये दिसत आहे. हे माकड रुग्णालयाच्या पायऱ्यांवर बसून कोणीतरी आपल्याकडे लक्ष देईल याची वाट पाहत असल्यासारखे इकडे तिकडे बघताना दिसत आहे. सध्या करोनामुळे रुग्णालयांमधील रुग्णांची संख्या वाढेलली असल्याने आरोग्य कर्मचाऱ्यांचे कामही वाढलं आहे. असं असतानाही मदतीसाठी रुग्णालयात धाव घेणाऱ्या या माकडाला रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी मदत केली.

stealing liquor, liquor Kalyan,
कल्याण : महागड्या मद्याच्या बाटल्यांवर चोरट्यांचा डल्ला, माल चोरून ढाब्यांना विक्री
Rat case Sassoon hospital, Rat case,
ससूनमधील ‘उंदीर’ प्रकरणात दोषी कोण? अखेर सत्य येणार बाहेर
Death of two brothers
पाण्याच्या टाकीत पडून दोन भावांचा मृत्यू: दाम्पत्यावर दुःखाचा डोंगर कोसळला असताना लगेचच झोपडीवरही कारवाई, न्यायालयाने घेतली दखल
pune, fergusson college, holi, boy, throwing water, balloons, pedestrians, arrested, police,
होळीच्या दिवशी रस्त्यावर फुगे मारणारी हुल्लडबाज मुले ताब्यात; पोलिसांकडून पालकांवर गुन्हे

व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये एक आरोग्य कर्मचारी बेसिनजवळ बसलेल्या माकडाच्या पाठीवर मलम लावताना दिसत आहे. तर माकड पाठीवर नक्की मार कुठे लागला आहे हे जखम झालेल्या ठिकाणी हात  लावून सांगण्याचा प्रयत्न करताना दिसते.

इंडियन फॉरेन सर्व्हिसमध्ये असणाऱ्या संदीप त्रिपाठी यांनीही ट्विटवरुन हा व्हिडिओ शेअर केला आहे. त्रिपाठी यांनी माकडाला मदत करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे कौतुक केलं आहे.

या व्हिडिओला हजारोच्या संख्येने व्ह्यूज तर शेकडोच्या संख्येने शेअर्स मिळाले असून अनेकांनी माकडाच्या हुशारीबरोबरच कर्मचाऱ्यांचेही कौतुक केल्याचे कमेंट सेक्शनमध्ये दिसत आहे.