08 March 2021

News Flash

Viral Video : म्हशींचा कळप जंगलाच्या राजा-राणीवरच हल्ला करतो अन्…

व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

आपल्या डरकाळीनं जंगला हातरवणाऱ्या राजाला मात्र म्हशीच्या कळपानं पळायला भाग पाडलं आहे. इतरवेळी सिंहाला पाहून धूम ठोकणाऱ्या म्हशीनं एकीच्या बळावर सिंहाला पळायला भाग पाडले. एकीचं बळाची पुन्हा प्रचिती आली आहे. जंगलाचा राजा आणि राणीला पळवून लावल्याचा दुर्मीळ व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.

सिंह आणि सिंहीण शिकारीसाठी जंगलात आले होते. त्यावेळी त्यांच्यासमोर म्हशींचा कळप आला. त्यावेळी म्हशीवर सिंहाने एक दोन वेळा हल्ला केला. पण सर्व म्हशी एकजुटीनं सिंहावर धावून गेल्या. एकीचं बळ पाहून सिंहानं माघार घेतली. जंगलाचा राजा आणि राणी आपला जीव मुठीत घेऊन पळत सुटले. या म्हशींच्या एकीजुटीसमोर त्यांना नमतं घ्यावं लागतं.

वन आधिकारी सुशांत नंदा यांनी हा व्हिडीओ आपल्या ट्विटर खात्यावर पोस्ट केला आहे. या व्हिडीओला नेटकऱ्यांनी चांगला प्रतिसाद दिलाय. लोकांना हा व्हिडीओ खूप आवडला असून तात्काळ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

एकीच बळ, म्हशींच्या कळपानं केलेल्या हिंमतीला अनेक नेटकऱ्यांनी दाद दिली आहे. एकीजुटीचं बळ केवढं मोठं असतं हे या व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 13, 2020 9:34 am

Web Title: viral video lioness run away from buffaloes nck 90
Next Stories
1 १२ सिंह एकत्र कधी पाहिलेत का? हा व्हिडीओ पाहून अंगावर काटा येईल
2 नवरदेवानं एकाच मांडवात दोघींबरोबर केलं लग्न; एक प्रेयसी तर दुसरी …
3 मुंबईतील या रिक्षात WiFi, सॅनिटायझर, बेसीन आणि झाडंही; महिंद्रा म्हणतात…
Just Now!
X