News Flash

Viral Video : मोठ्या खेकड्याला पकडण्यासाठी तो थेट शिरला चिखलात

धाडसी कृत्य फेसबुकवरील व्हिडिओतून हिट

Viral Video : मोठ्या खेकड्याला पकडण्यासाठी तो थेट शिरला चिखलात

वन्यजीवांवर प्रेम असणारे लोक कधी काय करतील याचा नेम नाही. नुकतीच अशी एक घटना घडली असून ऑस्ट्रेलियातील एकाने अशाचप्रकारे एक साहस केले आहे. यामध्ये भले काही दुर्घटना झाली तरीही चालेल मात्र प्राण्यांसाठी वेड्या असणाऱ्या या व्यक्तीने थेट चिखलाच्या खड्ड्यात शिरत एका भल्या मोठ्या खेकड्याला पकडले आहे. या खड्ड्यात शिरत त्याने या खेकड्याला बाहेर काढले. त्या भल्या मोठ्या खेकड्याला हातात घेतलेले आणि त्याला काढतानाचे या व्यक्तीचे फोटो आणि व्हिडिओ व्हायरल झाले असून लाखो जणांनी तो पाहिला आहे.

सौजन्य – स्पिरीट रेडिओ नेटवर्क

क्वीन्सलॅंड येथे राहणाऱ्या बीयू ग्रीव्स असे या वन्यायजीवप्रेमी व्यक्तीचे नाव असून त्याने हे धाडसी कृत्य केल्याचे समोर आले आहे.  अशा पद्आधतीने खेकड्याला बाहेर काढल्यानंतरचे व्हिडिओ फेसबुकवर अपलोड केल्याने त्याला प्रसिद्धी मिळाली आहे. याविषयी सांगताना ग्रीव्स म्हणाला, या चिखलातील खड्ड्यात शिरल्यानंतर दोन वेळा मला खेकड्याने चावले. त्यावेळी मी जवळपास माझ्या हाताचे एक बोटच गमावण्याच्या स्थितीत होतो. परंतु तुम्ही जे कराल त्याचे फळ तुम्हाला निश्चितच मिळते. त्याप्रमाणे हा अतिशय मोठा खेकडा माझ्या हाती लागला.

चिखलात आत शिरल्यावर काठीच्या मदगतीने एक युक्ती वापरत त्याने या खेकड्याला बाहेर काढल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. त्याने यामध्ये आपण कशा पद्धतीने खेकड्याचा शोध घेतला हेही सांगितले जेणेकरुन इतरांनाही त्याची ही पद्धत अवलंबता येईल. अवघ्या काही दिवसात या व्हिडिओने असंख्य व्ह्यूज मिळवले आहेत. तर अनेकांनी त्याला लाईक करुन शेअरही केले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 1, 2017 7:05 pm

Web Title: viral video man crawls into hole of mud to pull out huge mud crab
Next Stories
1 ‘या’ गुगल अॅपमुळे मोबाईल इंटरनेट डेटा वाचवू शकाल!
2 १२ सिंहांच्या सुरक्षाकवचात अॅम्ब्युलन्समधील मातेने दिला चिमुकल्याला जन्म
3 डॉक्टरांच्या आधारामुळे स्वाभिमानी शेतकऱ्याला अश्रू अनावर!
Just Now!
X