News Flash

Viral Video : माकडानं धुतले देशी स्टाइलनं कपडे; नेटिझन्सने दिली कौतुकाची दाद

माकड कपडे धुवत असताना जवळच असली माणसं हसतानाचा आवाज व्हिडीओ येतोय.

माकडाचा कपडे धुतल्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये माकड देशी स्टाइलनं कपडे धुतना दिसत आहे. माकडाच्या कपडे धुण्याच्या स्टाइलवर नेटकरी चांगलेच फिदा झाले असून कौतुकही करत आहेत.

आयएफएस अधिकारी सुशाता नंद यांनी माकडाचा कपडे धुतानाचा व्हिडीओ अपलोड केला आहे. या व्हिडीओत माकड पांढरे कपडे देशी स्टाइलने धुताना दिसत आहे. कपडे दगडावर आपटून झाल्यानंतर जवळच्या टबमध्ये असलेल्या पाण्यामध्ये माकड साफ करत असल्याचे व्हिडीओत पाहायला मिळत आहे. माकड कपडे धूत असताना जवळच असलेली माणसं याचा खळखळून आनंद घेत आहेत.

या माकडाचा व्हिडीओ व्हायरल झाल्यापासून सोशल मीडियावर त्याची चर्चा रंगली असून अनेकांनी या माकडाचं कौतुक केलं आहे. त्यासोबतच अनेकांनी ‘या माकडाकडून काही तरी शिका’, असंही म्हटलं आहे. हा व्हिडीओ अनेकांनी सोशल मीडियावर शेअर केला आहे. नेटकऱ्यांनी त्या माकडावर कौतुकांची थाप टाकली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 7, 2019 3:51 pm

Web Title: viral video monkey washes clothes desi style gets praise online nck 90
Next Stories
1 काम, घरी बसणे, महिन्याला आठ लाख पगार
2 तुम्ही कधीही पाहिला नसेल असा ‘गेमिंग लॅपटॉप’ !
3 … म्हणून त्यानं चालवली प्लॅटफॉर्मवर रिक्षा; कोर्टानंही केलं माफ
Just Now!
X