मध्य प्रदेशमधील बैतूलमधील सलैया गावात एक निराळी घटना घडली आहे. येथील एका नवरदेवाने एकाचवेळी दोन मुलींशी लग्न केलं आहे. त्यामधील एक मुलगी त्याची प्रेयसी तर दुसरी मुलगी आई-वडिलांनी लग्नासाठी पाहिलेली होती. २९ जून रोजी ही घटना घडली आहे.
तरुणाने एकाच मांडवात प्रेयसी आणि आई-बाबांनी पाहिलेल्या मुलीसोबत लग्न केलं. या लग्नाला नवरी आणि नवरदेवाच्या कुटुंबातील तसेच सलैया गावातील लोक उपस्थित होते.

सलैया गावातील आदावीस तरुण संदीप उईकेने होशंगाबाद जिल्ह्यातील सुनंदा आणि घोडाडोंगरी येथील शशिकला या दोघींशी लग्न केलं. संदीप भोपाळमध्ये आयटीआयमध्ये शिकत आहे. शिक्षण सुरु असताना संदीप आणि सुनंदा यांच्यात प्रेम झालं. त्याचवेळी संदीपच्या घरच्यांनीही त्याचं लग्न ठरवलं. याच मुद्द्यावर तिन्ही कुटुंबात सतत वाद सुरु झाले.

हा वाद मिटवण्यासाठी तिन्ही कुटुंबांनी तसेच समाजातील लोकांनी पंचायत बोलवली. यामध्ये असा निर्णय झाला की, जर दोन्ही मुली तरुणासोबत लग्न करण्यास तयार असलीत तर एकाच मांडवात तिघांचे लग्न लावावे. त्यानंतर दोन्ही मुलींना विचारले असता त्यांनी संदीपसोतच लग्न करयाचं असल्याचं म्हटलं. अखेरसी एकाच मांडवात तिघांचं लग्न झालं.


या लग्नाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.