मुंबईतील वर्दळीच्या रस्त्यांपैकी एक असलेल्या पेडर रोडवर शनिवारी संध्याकाळी एक वेगळाच ‘राडा’ पाहायला मिळाला. एका महिलेने या रस्त्यावर चांगलाच गोंधळ घातला. स्वतःच्या पतीला दुसऱ्या महिलेसोबत बघितल्यानंतर या महिलेने रस्त्यावर गोंधळ घालायला सुरूवात केली. भररस्त्यात सुरू असलेल्या गोंधळामुळे वाहनांच्याही रांगा लागल्या होत्या. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

शनिवारी संध्याकाळी साडेचार ते पाच वाजण्याच्या सुमारास एक तीस वर्षीय व्यक्ती काळ्या रंगाच्या रेंज रोव्हर कारमधून एका महिलेसोबत जात होता. ते पेडर रोडवर पोहोचल्यानंतर पांढऱ्या कारमधून त्यांचा पाठलाग करणारी त्या व्यक्तीची पत्नी त्याला गाडी थांबवायला भाग पाडते. त्याची पत्नी थेट रेंज रोव्हरच्या समोर जाऊन उभी राहते आणि जोरजोरात गोंधळ घालायला सुरूवात करते. पती गाडीचा दरवाजा उघडत नाही त्यामुळे खिडकीतून पतीला मारहाण करण्याचाही ती प्रयत्न करताना या व्हिडिओमध्ये दिसतंय. शेवटी ही महिला थेट गाडीच्या बोनटवर चढून कारच्या काचेवर बूट मारायला सुरूवात करते. बाजूलाच उभे असलेल्या ट्रॅफिक पोलिसांचांही ही महिला ऐकत नाही. अखेर पती कारच्या बाहेर येतो, मग त्याला ही महिला लाथांनी मारहाण करते.  नंतर दोघं पांढऱ्या कारमध्ये बसतात. पण थोड्याचवेळात त्याची पत्नी पु्न्हा गाडीतून उतरुन पळत जात दुसऱ्या कारमध्ये बसलेल्या महिलेला मारहाण करते. अखेर पोलिस मध्यस्थी करुन त्या महिलेची सुटका करतात.

garvit and nandini suicide instagram
‘लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या युट्यूबर जोडप्याची अवघ्या पंचवीशीतच आत्महत्या
Smuggling liquor, Delhi to Mumbai, State Excise Department, Seizes 205 Bottles, Foreign Liquor, Arrests one man, crime, marathi news,
दिल्लीवरून मुंबईत मद्याची तस्करी
IPL 2024 Gujarat Titans vs Mumbai Indians Match Updates in Marathi
IPL 2024 GT vs MI: “मुंबईचा राजा…” अहमदाबादमध्ये रोहित शर्माच्या चाहत्यांनी केलं हार्दिक पांड्याला ट्रोल, VIDEO व्हायरल
Girls intimate Holi Celebration Inside Delhi Metro
“अंग लगा दे रे, मोहे रंग…”, मेट्रोमध्ये तरुणींच्या अश्लील डान्समुळे ओशाळले प्रवासी! Viral Video पाहून संतापले नेटकरी


दरम्यान, या घटनेनंतर ट्रॅफिक पोलिस दोन्ही गाड्या आणि त्या दाम्पत्याला घेऊन गावदेवी पोलीस ठाण्यात पोहोचले. पण त्यांनी तक्रार करण्यास नकार दिल्याची माहिती पोलिसांनी दिली. तर, महिलेवर रस्त्यावर अडथळा निर्माण करुन ट्रॅफिक जॅम केल्याबद्दल चलान आकारण्यात आलं आहे.