लहान मुलांना अनेकदा तितके गांभिर्याने घेतले जात नाही. मात्र अनेकदा त्यांचे कौशल्य पाहून आपणही कधीकधी आश्चर्यचकित होतो. आता ही गोष्ट इतकी लहान मुलं नेमकी कुठून शिकली असा प्रश्नही अनेकदा आपल्याला पडतो. असाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. यामध्ये एक लहान मुलगा अतिशय चांगल्या पद्धतीने फुटबॉल आपल्या पायावर झेलत आहे. असे करत असताना त्याचा फुटबॉल एकदाही खाली पडत नाही. खरं तर मोठ्यांनाही जमायला अवघड असणारा हा खेळ हा चिमुकला अतिशय सहज करत असल्याने त्याचे खऱ्या अर्थाने कौतुक करावे तेवढे थोडेच.

इतक्या शिताफीने फुटबॉल पायावर झेलत असताना असताना त्याची नजरही अजिबात इकडे-तिकडे जात नाही. त्यामुळे या चिमुकल्याची खेळातील एकाग्रता आपल्याला दिसून येत आहे. किपी अपी असे खेळाचे नाव आहे. या लहानग्याचा व्हिडिओ युट्यूबवर अपलोड करण्यात आला असून तो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या लहानग्याची कसरत पाहताना फार मजा वाटते आणि हे तो कसे करतोय असा प्रश्नही निर्माण होतो.

Video : बिलावरून वाद घालणाऱ्या ग्राहकांवर मालकाने फेकले उकळते तेल

हा व्हिडिओ कुठला आहे आणि व्हिडिओमधल्या त्या मुलाचं नाव काय आहे, याची माहिती मात्र अद्याप समोर आलेली नाही. या खेळासाठी सरावाची गरज असते. इतकेच नाही तर प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाखालीच या खेळाचा सराव करावा लागतो. एखादी किक जरा चुकीची पडली तरी खेळाडू खाली पडू शकतो. त्यामुळे वरवर पाहता हा खेळ सोपा वाटत असला तरी त्यासाठी तितक्याच सरावाची गरज असते. म्हणूनच त्याचं सोशल मीडियावर बरेच कौतुक होत आहे.