22 November 2019

News Flash

‘इमानी’ !श्वानानं चिमुकलीचे वाचवले प्राण, व्हिडीओ व्हायरल

सध्या सोशल मीडियावर या श्वानचे प्रचंड कौतुक होत असून तो साऱ्यांसाठी स्टार झाला आहे.

कुत्र्यासाठी वापरलं जाणारं ‘इमानी’ हे विशेषण किती समर्पक आहे, हे उत्तर सध्या व्हायरल होत असणाऱ्या व्हिडीओतून दिसून येत आहे. पाण्यात जाणाऱ्या चिमुकलीला श्वानानं खेचून बाहेर काढत प्राण वाचवले आहे. सध्या या श्वानाचा आणि लहानग्या मुलीचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.

सध्या सोशल मीडियावर या श्वानचे प्रचंड कौतुक होत असून तो साऱ्यांसाठी स्टार झाला आहे. बोलता न येणारा पण आपल्या भावना समजून घेणारा हा कुत्रा आपल्या लहानग्या मैत्रिणीला वाचविताना या व्हिडिओमध्ये दिसत आहे.

१६ सेंकदाच्या व्हिडीओमध्ये मुलगी नदीमध्ये पडलेला चेंडू घेण्यासाठी जाताना दिसत आहे. पाण्यात गेलेला चेंडू बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या मुलीचा फ्रॉक पकडून श्नानानं तिला नदीच्या किनाऱ्यापासून दूर केल्याचं दिसत आहे. त्यानंतर श्नान नदीमध्ये जाऊन तोंडात चेंडू घेऊन येतो.

श्वानाच्या मनात चिमुरडीवर असलेलं प्रेम पाहून उपस्थित साऱ्यांनाच त्यांच कौतुक वाटलं आहे. १६ सेकंदाचा हा व्हिडीओ पाहून सोशल मीडियावर प्रत्येकजण भावनिक झालेल्याचे दिसून आले. हा व्हिडीओ Physics-astronomy.org या ट्विटर अकाउंटवर पोस्ट करण्यात आला आहे. या व्हिडीओला आतापर्यंत ९८ हजारांपेक्षा जास्त लोकांनी रिट्विट केलं आहे तर ३.५ बिलियन पेक्षा आधिक नेटकऱ्यांनी पाहिला आहे.

First Published on June 18, 2019 3:27 pm

Web Title: viral video of dog saving girl from falling into deep water is making the internet very emotional nck 90
Just Now!
X