एखाद्या छोट्या मोठ्या हॉटेलमध्ये ग्राहकाच्या ताटात उरलेले पदार्थ काढून ते दुसऱ्या ग्राहकाचा ताटात वाढायचे वगैरे प्रकार अनेकांनी पाहिले असतील पण जगातल्या सर्वोत्तम एअरलाईन्समध्ये असे प्रकार होतात असं कळलं तर? तुम्हालाही धक्का बसेल ना? एमिरेट एअरलाईनमधे असा एक प्रकार घडलाय आणि प्रवाशाने तो उजेडात आणला आहे. या प्रकरणामुळे एमिरेटच्या सेवेवर मोठ्या प्रमाणात निंदा होत आहे. बिझनेस क्लासमधून प्रवास करणाऱ्या एका प्रवाशाने व्हिडिओ इन्स्टाग्राम अकाऊंटवर अपलोड केलाय.

Viral Video : एका मुलीच्या गुगलीवर उमर अकमल क्लीन बोल्ड!

ज्यात एमिरेट एअरलाईनची एअर हॉस्टेस ग्लासमध्ये उरलेली शॅम्पेन एका बाटलीत भरून ठेवत होती. हा व्हिडिओ पोस्ट करून ‘ एमिरेटमध्ये असे नेहमीच चालते का?’ असा प्रश्न त्यांनी विचारला आहे. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर एमिरेटने निवेदन जारी केलंय. आम्ही जगातील सर्वोत्तम सेवा देण्याचा प्रयत्न करतो. या प्रकरणाची आम्ही चौकशी करत असून लवकरच यात दोषी आढळलेल्यांवर कारवाई केली जाईल असं एमिरेटनं म्हटलं आहे. मात्र ज्या रशियन प्रवाशाने हा व्हिडिओ अपलोड केलाय, त्याने काही वेळातच हा व्हिडिओ आपल्या अकाऊंटवरून डिलीट केलाय. त्याने हा व्हिडिओ का डिलीट केलाय त्याचे कारण मात्र समजू शकले नाही.

वाचा : सरकारी कार्यालयातील कर्मचारी करतात ८ तास हेल्मेट घालून काम