01 March 2021

News Flash

आजीचा दरारा…डान्स थांबवून आजोबांनी ठोकली ‘धूम’; हसून लोटपोट करणारा व्हिडिओ तुफान व्हायरल

हातात काठी घेऊन येणाऱ्या आजीला बघताच आजोबांनी डान्स थांबवून ठोकली 'धूम'

नवरा बायकोवरुन अनेक विनोद, फोटो, व्हिडिओ किंवा मीम सर्रास शेअर होत असतात. नवरा बायकोला घाबरतो…बायकोच खरी ‘होम मिनिस्टर’… असं सांगणारे अनेक मेसेजही सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. सध्या अशाच एका आजी-आजोबांचा व्हिडिओ सोशल मीडियामध्ये तुफान व्हायरल होतोय.

व्हिडिओत दिसणाऱ्या आजींचा दरारा इतका आहे की नाचण्यात दंग झालेले आजोबा आजी येत असल्याची नुसती चाहुल लागताच सुसाट पळत सुटताना या व्हिडिओत दिसतात. एका कार्यक्रमातला हा व्हिडिओ असून डीजेच्या तालावर आजोबा बेभान होऊन नाचताना दिसतायेत. तितक्यात नाचणाऱ्या मंडळींमधून मार्ग काढत एक आजी हातात काठी घेऊन येताना दिसते. आजीला येताना बघताच नाचण्यात दंग असलेले आजोबा डायरेक्ट ‘धूम’ ठोकतात आणि तिथून ‘गायब’ होतात. बघा व्हिडिओ :-

आणखी वाचा- मालकिणीचा आदेश येताच म्हशीने फिल्मी गाण्यावर केला जबरदस्त डान्स, बघा Viral Video

हा व्हिडिओ नेमका कुठला हे समजू शकलेलं नाही, पण आजीचा दरारा आणि आजोबा गायब अशा कॅप्शनसह हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालतोय.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 15, 2021 9:17 am

Web Title: viral video of old husband ran away while dancing after seeing wife coming aji ajoba video sas 89
Next Stories
1 Video : …म्हणून Amazon चा डिलेव्हरी बॉय चक्क घोड्यावरुन आला
2 …म्हणून मुंबईतील कंपनीने तरुणाला नाकारली नोकरी!
3 तेरी मेरी यारी..! गारठवणाऱ्या थंडीमुळे ‘मित्र’ झाले कुत्रा आणि मांजर, शेकोटीसाठी बसले एकत्र; बघा व्हिडिओ
Just Now!
X