24 September 2020

News Flash

सशालाही लाजवेल असा कासवाचा वेग, एकाच फटक्यात कबुतराची शिकार; व्हिडीओ पाहून नेटकरी हैराण

कासवाने कबुतराची मान पकडली आणि ओढत पाण्यात नेलं

कासव म्हटलं की अनेकांना शाळेतली ससा आणि कासवाच्या शर्यतीची गोष्ट आठवते. त्या गोष्टीमुळे कासवाबद्दल सर्वांच्याच मनात बालपणापासून एक प्रतिमा तयार झालेली आहे. शांत, संयमी तसंच धीम्या गतीचं कासव असं अनेकजण त्याचा उल्लेख करतात. पण सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एक व्हिडीओमुळे नेटकरी हैराण झाले असून आश्चर्य व्यक्त करत आहेत. या व्हिडीओत कासवाने कबुतराची शिकार केली असून त्याचा वेग पाहून नेटकरी आश्चर्यचकित झाले आहेत.

याआधी कधीही न पाहिलेला हा व्हिडीओ वेगाने सोशल मीडियावर पसरत आहे. Nature Is Scary या नावाने ट्विटर हॅण्डल असणाऱ्या अकाऊंटवरुन हा व्हिडीओ शेअर झाला आहे. व्हिडीओ शेअर करताना ‘कासवाने कबुतराला ठार केलं’ अशी कॅप्शन त्यांनी दिली आहे.

१० सेकंदाच्या या व्हिडीओत कासव शांतपणे पाण्याच्या बाहेर येताना दिसत आहे. यानंतर वाऱ्याच्या वेगाने कासव तिथेच बसलेल्या कबुतराची मान तोंडाने पकडतं आणि पाण्यात घेऊन जातं. हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत असून कासवाचं हे रुप याआधी आपण पाहिलं नसल्याची प्रतिक्रिया अनेकजण देत आहेत.

काही जणांनी आतापर्यंत पाहिलेलं हे वेगवान कासव असल्याचं म्हटलं आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 15, 2020 4:57 pm

Web Title: viral video of turtle kills pigeon sgy 87
Next Stories
1 व्यंकय्या नायडूंनी मनोज झा यांची फिरकी घेताच राज्यसभेत पिकला हशा
2 फोटोच्या नादात अरविंद केजरीवाल झाडाऐवजी कुंडीखालील ट्रेलाच घालत होते पाणी?
3 मंदीमध्ये संधी! अ‍ॅमेझॉन एक लाख लोकांना देणार रोजगार
Just Now!
X