27 February 2021

News Flash

सुनावणीदरम्यान सेक्स करत असताना झूम कॉलचा कॅमेरा झाला ऑन; न्यायाधीश संतापले अन्…

झूम कॉलदरम्यान वकिलाचा महिलेसोबत सेक्स

पेरु येथे आपल्या बेजबादार वर्तवणुकीमुळे एका वकिलाचं सार्वजनिक आयुष्य चर्चेत आलं असून करिअरही धोक्यात आहे. झूम कॉलवर सुनावणी सुरु असतानाच वकिल आपल्या ग्राहकासोबत सेक्स करत होता. कॅमेरा ऑन असल्याची कोणतीही कल्पना नसलेल्या वकिलाचं हे दृश्य पाहून न्यायाधीशांनाही मोठा धक्का बसला. न्यायाधीशांनी वकिलाला फक्त केसपासून दूर केलं नाही तर त्याच्याविरोधात दोन गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले आहेत.

ही घटना पेरु येथील पिचानकी शहरातील आहे. न्यायाधीश जॉन चाहुआ टोरेस यांच्या कोर्टात संघटित गुन्हेगारीवर सुनावणी सुरु होती. बचावपक्षाच्या वतीने हेक्टर रॉबेल्स यांना युक्तिवाद करायचा होता. पण वेळेआधीच त्यांच्या कॉम्प्यूटरचा कॅमेरा ऑन झाला होता. यादरम्यान ते आपल्या महिला ग्राहकासोबत सेक्स करत होते. यावेळी कॅमेरा सुरु आहे याची त्यांना कल्पनाच नव्हती. यादरम्यान केसची सुनावणी सुरु झाली.

ज्यावेळी हेक्टर सेक्स करत होते तेव्हा ते लाइव्ह सुरु होतं आणि अनेकजण ते रेकॉर्ड करत होते. विशेष म्हणजे हे सर्व न्यायाधीशांसमोरच सुरु होतं. यानंतर संतापलेल्या न्यायाधीशांनी तात्काळ पोलिसांनी न्यायालयीन प्रक्रिया थांबवण्याचा आदेश दिला. त्यांनी पोलिसांना तात्काळ मध्यस्थी करण्यासाठी पाठवल. दरम्यान एक महिला सहकारी वकिलाला अलर्ट करण्याचा प्रयत्न करत होते.

न्यायाधीश जॉन चाहुआ टोरेस यांनी हा कोर्टाचा अपमान असल्याचं सांगत गुन्हा दाखल करण्याचा आदेश दिला आहे. वकील हेक्टर यांच्याविरोधात कोर्टात खटला चालणार आहे. दुसरीकडे न्यायाधीशांनी प्रकरणाची सुनावणी रोखली असून हेक्टर यांना प्रकरणातून हटवलं आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 8, 2021 1:36 pm

Web Title: viral video peruvian lawyer caught having sex during zoom court hearing sgy 87
Next Stories
1 मिया खलिफाच्या पोस्टरला केक भरवतायेत काँग्रेसचे कार्यकर्ते? जाणून घ्या व्हायरल फोटोमागचं सत्य
2 Farmer Protest : ‘समोसा-गुलाबजाम’ खात मिया खलिफाने पुन्हा दिला शेतकऱ्यांना पाठिंबा, शेअर केला Video
3 रोहित शर्मा नव्हे रोहित ‘शाणा’! स्वतःच्या गोलंदाजीची नक्कल करताना बघून हरभजनची मजेशीर प्रतिक्रिया
Just Now!
X