News Flash

Viral Video : हे काय? चोरी करताना पोलीसच ‘सीसीटीव्ही’त कैद

सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल

कधी काय घडेल हे याचा काही नेम नाही. चोरच नेहमी चोरी करतात, असं सगळेच जण ऐकून आहेत. पण नोएडामध्ये जे घडलं ते ऐकून तुम्हीही डोक्याला हात लावाल. एरवी चोर कैद होणाऱ्या सीसीटीव्हीमध्ये चक्क पोलिसच चोरी करताना पकडला आहे. विशेष म्हणजे हा पोलीस दूधाच्या पिशव्यांची चोरी करत होता. हा व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

उत्तर प्रदेशमधील नोएडा शहरात गस्तीवर असलेल्या एका पोलिसाचा दूधाच्या पिशव्या चोरतानाचा व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल झाला आहे. १९ जानेवारी रोजी हा पोलीस रात्री गस्तीवर होता. एका दुकानासमोर दूधाच्या पिशव्या ठेवण्यात आलेल्या होत्या. हा पोलीस आजूबाजूला आधी बघतो. त्यानंतर हा पोलीस दूधाच्या पिशव्या चोरून गाडीत बसलेल्या सहकाऱ्याला देतो, असं या व्हिडीओत दिसत आहे.

दूधाच्या पिशव्या चोरतानाचा पोलिसाचा हा व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 21, 2020 12:01 pm

Web Title: viral video policeman seen stealing packets of milk in noida bmh 90
Next Stories
1 OTP शिवाय खात्यातून 1.5 लाख रुपये चोरले, हॅकर्सच्या निशाण्यावर डेबिट/क्रेडिट कार्ड्स
2 स्वतःच्याच लग्नात पोहोचू शकला नाही जवान; रस्त्यातच ओढवलं संकट
3 Viral Video: मोदींची पुन्हा शिवाजी महाराजांशी, तर तान्हाजींची अमित शाहांशी तुलना
Just Now!
X