देशात सोशल मीडियाचा वापर मागच्या काही दिवसात वाढल्याने कधी काय व्हायरल होईल याचा नेम नाही. आता हेच पाहा ना शाळेतील शिक्षकांनी आपल्या विद्यार्थ्यांना आपली दुचाकी धुवायला लावली. आता या शिक्षिकेने असे का केले हे मात्र अद्याप कळले नाही. या शिक्षकेने असे करायला लावल्याने त्यांच्यावर गुन्हाही दाखल होऊ शकतो.

ओडिशामध्ये नुकताच एक प्रकार घडला. अंगुल जिल्ह्यातील माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांसोबत अतिशय अजब प्रकार घडला आहे. येथील विद्यार्थ्यांना शाळेतील शिक्षकांनी आपली दुचाकी धुवायला लावली. इतकेच नाही तर मुले गाडी नीट धुवत आहेत की नाही हे पाहण्यासाठी ही शिक्षिका त्याचठिकाणी थांबून हातात काठी घेऊन विद्यार्थ्यांमागे उभी होती. अशाप्रकारे विद्यार्थ्यांना दुचाकी धुवायला लावल्यास ते अभ्यास कधी करणार असा प्रश्नही यानिमित्ताने उपस्थित झाला आहे.

या व्हिडिओमध्ये २ मुली आणि एक मुलगा या शिक्षिकेची गाडी धुवत असताना दिसत आहेत. बादलीतील पाणी टाकून कापडाने पुसून घेताना या विद्यार्थिनी दिसत आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांचे हे एकप्रकारे रॅगिंग आहे असेच म्हणता येईल.