क्रिकेटचा सामना म्हटलं की नाणेफेक हा सर्वात महत्वाचा हिस्सा मानला जातो. या नाणेफेकीदरम्यान तुम्ही कधी, सरळं पडलेलं नाणं पाहिलं आहेत का? शोले चित्रपटात हा प्रसंग तुम्ही पाहिला असेल….मात्र प्रत्यक्ष सामन्यात असा प्रकार घडला आहे. मलेशियात सुरु असलेल्या १९ वर्षाखालील आशिया चषक स्पर्धेत नेपाळ विरुद्ध हाँग काँग सामन्यादरम्यान नाणेफेकीचं नाणं हे सरळ जमिनीवर पडलं आहे. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय.

इतकचं काय खुद्द आयसीसीनेही या प्रकाराची दखल घेतली आहे.

हवेत उडवलेलं नाणं जमिनीवर सरळ पडताच उपस्थित कर्णधारांमध्ये हशा पिकला. पुन्हा एकदा नाणेफेक करण्याआधी पंच आणि कर्णधारांनी या अनोख्या नाण्यासोबत फोटोही काढला. दरम्यान या सामन्यात नेपाळने हाँग काँगवर ६ गडी राखून मात केली. क्रिकेटच्या इतिहासात असा प्रकार पहिल्यांदाच घडला असल्याचं बोललं जातंय.