News Flash

Video : लॉकडाउनमध्ये नाग आणि मांजर आले आमनेसामने, जोरदार शक्तीप्रदर्शन

मांजरानं केला काळजाचा ठोका चुकवणारा वार

समोर मांजर दिसताच नागानेही फणा काढून आव्हान दिलं.

साप आणि मुंगूस यांचं वैर सर्वश्रुत आहे. त्यामुळे दोघे कधी समोर आले, तर घणघोर युद्धच बघायला मिळतं. पण, इंदौरमध्ये नाग आणि मांजरातील काळजाचा ठोका चुकवणारी फाईट व्हायरल झाली आहे. रस्त्याकडेला असलेल्या फुटपाथवर अचानक मांजर आणि नाग समोरासनमोर येतात. त्यानंतर जे घडलं, ते बघण्यासारखंच आहे.

इंदौर शहरात हा व्हिडीओ एका व्यक्तीनं आपल्या कॅमेऱ्यात कैद केला आहे. रस्त्याकडेला असलेल्या फुटपाथवर अचानक मांजर आणि नाग एकमेकांसमोर आले. त्यानंतर काही क्षण एकमेकांसमोर ते उभे होते. मात्र, अचानक मांजरीनं आपल्या नेहमीच्या शैलीत नागावर हल्ला केला. मांजरीनं केलेल्या हल्ल्यानं नागही चवताळला आणि मांजरीच्या अंगावर चाल करून गेला.

त्यानंतर दोघांनीही काही क्षण शक्ती प्रदर्शन केलं. मांजरीनं थोडा सावध पवित्रा घेताच नागानं, आपली वाट धरत पळ काढला. मात्र, त्यानंतरही मांजरीनं नागाचा पिच्छा सोडला नाही. नागाचा पाठलाग करत मांजर भिंतीवरून उडी मारून पलिकडच्या बाजूला निघून गेली. हा व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 6, 2020 3:28 pm

Web Title: viral video snake and cat big fight video bmh 90
Next Stories
1 Video: याला म्हणतात Dedication… गारपीट होत असतानाही छत्री घेऊन लावली दारुसाठी रांग
2 लॉकडाउनमध्ये Airtel चं ‘गिफ्ट’! ‘फ्री’मध्ये बघा अनलिमिटेड सिनेमे आणि टीव्ही शो
3 WhatsApp द्वारे ऑर्डर करा स्मार्टफोन, शाओमीची Mi Commerce सेवा लॉन्च
Just Now!
X