11 August 2020

News Flash

१२ सिंह एकत्र कधी पाहिलेत का? हा व्हिडीओ पाहून अंगावर काटा येईल

व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

रुबाबदार चाल, भेदक नजर, भारदस्त शरीर, आकर्षक रूप अशा बहुविध लक्षणांनी ओळखला जाणारा सिंह भारताचा राष्ट्रीय प्राणी आहे. सिंहाला जंगलाचा राजा म्हटले जाते. सिंह समोर आला तरी अंगावर काटा उभा राहतो. असे असताना एकत्र १२ वाघ तुम्ही कधी पाहिलेत का? सध्या सोशल मीडियावर १२ सिंहाचा एक व्हिडिओ व्हायरल होतोय.

गुजरातमधील गीर जंगलातील हा व्हायरल व्हिडीओ आहे. हा व्हिडीओ नेमका कधीचा माहित नाही. पण वन आधिकारी सुशांत नंदा यांनी या सिहांचा हा व्हिडीओ ट्विटरवर पोस्ट केला आहे. एक मिनिटं १४ सेकंदाच्या या व्हिडीओत १२ सिहांचे दर्शन होते. एकापाठोपाठ एक असे सिंह पाणी पिण्यासाठी एकाच तलावावर जमले आहेत.

गुजरातमधील गीर जंगलात एकत्र १३ सिंह पाणी पिण्यासाठी आले होते. सुरुवातीला येथे एक सिंह पाणी पित होता. त्यानंतर एकापाठोपाठ एक असे १२ सिंह पाणी पिण्यासाठी आले होते. विषेष म्हणजे, एका ओळीत सर्व सिंह पाणी पित होते.


या सिंहांना पाहून तुमच्या अंगावर काटा आल्याशिवाय राहणार नाही.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 13, 2020 8:36 am

Web Title: viral video sushant nanda post video 12 tiger nck 90
Next Stories
1 नवरदेवानं एकाच मांडवात दोघींबरोबर केलं लग्न; एक प्रेयसी तर दुसरी …
2 मुंबईतील या रिक्षात WiFi, सॅनिटायझर, बेसीन आणि झाडंही; महिंद्रा म्हणतात…
3 “मी सर्व डॉक्टर,आरोग्य कर्मचाऱ्यांसमोर नतमस्तक होतो कारण तुम्ही नसता तर…”; अमिताभ यांचा व्हिडिओ व्हायरल
Just Now!
X