सिंहाचा कळप मिळून एका म्हशीची शिकार करतो, असे व्हिडीओ तुम्ही खूपदा पाहिलं असतील. पण म्हशीनं सिंहाच्या कळपाला पळवून लावल्याचा एक व्हिडीओ सध्या तुफान व्हायरल होतोय. आपल्या डरकाळीनं जंगला हातरवणाऱ्या राजाला मात्र म्हशीच्या कळपानं पळायला भाग पाडलं आहे. इतरवेळी सिंहाला पाहून धूम ठोकणाऱ्या म्हशीनं एकीच्या बळावर सिंहाच्या कळपाला पळायला भाग पाडले. एकीचं बळाची पुन्हा प्रचिती आली आहे. सिंहाच्या कळपाला पळवून लावल्याचा दुर्मीळ व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.
IFS अधिकारी सुशांत नंदा यांनी हा दुर्मिळ व्हिडीओ आपल्या ट्विटरवर पोस्ट केला आहे. या व्हिडीओमध्ये आपण पाहू शकता की एकीकडे सिंहाचा कळप शांतपणे उभा आहे. तर काही सिंह इकडे तिकडे फेऱ्या मारत आहेत. अचानक समोरून म्हशींचा कळप येतो अन् सिंहांच्या कळपाला पळताभुई थोडी होती. संतापलेल्या या म्हशी सिंहांच्या अंगावर धावून जातात आणि सिंह तिथून पळ काढतात.
Battle of Waterloo for lions…
United buffalo heard outgunning the lion pride.( Shared by Erik Solheim) pic.twitter.com/6qRpBRIsxe
— Susanta Nanda IFS (@susantananda3) September 25, 2020
हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहून नेटकरी एकीच्या बळीची पुन्हा एकदा प्रचिती आल्याच्या प्रतिक्रिया देत आहेत.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on September 28, 2020 5:35 pm