News Flash

Viral Video: विराट कोहलीनं मुलीचा उल्लेख ‘कुरूप’ केला नी ट्रोल झाला

विराटवरही आता ट्रोल होण्याची वेळ आली आहे, ती देखील एका खूप जुन्या व्हिडीओवरून

कॉफी विथ करणमध्ये महिलांसंदर्भात हीन वक्तव्यं करण्याची फळं हार्दिक पांड्या व के एल राहूल भोगत असताना आता विराट कोहलीचा एक जुना व्हिडीओ व्हायरल झाला आहे. त्यानं एका मुलीचा उल्लेख कुरूप होती असा केला असून विराटवरही आता ट्रोल होण्याची वेळ आली आहे, ती देखील एका खूप जुन्या व्हिडीओवरून.

पांड्या व राहूल यांनी केलेली हीन वक्तव्यं त्यांना इतकी महागात पडली की बीसीसीआयनं त्यांच्यावर अनिश्चित काळासाठी निलंबनाची कारवाई केली आहे. सोशल मीडियावर प्रचंड चर्चा या विषयावर झाली पांड्या व राहूलवर टीकेचा भडीमार झाला आणि आता विराटचा एक जुना व्हिडीओ व्हायरल होत आहे. ऑस्ट्रेलियातील एका पत्रकारानं हा व्हिडीओ ट्विट केला आहे. अनुष्का दांडेकर या निवेदिकेनं विराटला सगळ्यात पटकन आटोपलेली डेट कुठली असा प्रश्न विचारला होता. त्यानं सांगितलं की, “मी अपरिचित अशा मुलीसोबत डेट ठरवली होती, जी पाच मिनिटांतच संपली. त्या मुलीला बघताच मी पळून गेलो.” अनुष्कानं यावर तो का पळाला असा प्रश्न विचारला. त्यावर विराटनं ती कुरूप होती असं उत्तर दिलं.

पांड्या व राहूल प्रकरणावर विराटची प्रतिक्रिया घेतली असता विराट उद्गारला होता की, भारतीय क्रिकेट संघाच्या दृष्टीने विचार करायचा तर अशा परिस्थितीत कुठल्याही चुकीच्या वक्तव्यांना आम्ही पाठिशी घालणार नाही. त्या दोघाही खेळाडूंना त्यांची चूक लक्षात आली असून ती किती मोठी आहे याचीही कल्पना आल्याचं विराटनं म्हटलं आहे. या प्रकरणाचा चांगलाच फटका त्यांना बसला असून ही गोष्ट योग्य झाली नसल्याचं त्यांच्या नक्कीच लक्षात आली असेल असंही विराटनं म्हटलं आहे. आता, विराटचाच एक जुना व्हिडीओ व्हायरल झाला असून त्यात तो एका मुलीचा उल्लेख कुरूप असा करताना दिसत असल्यामुळे नवीन वाद होण्याची शक्यता आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 14, 2019 4:37 pm

Web Title: viral video virat calls girl ugly
Next Stories
1 धोनीला भेटण्यासाठी ८७ वर्षीय महिला पोहोचली मैदानात
2 VIDEO: ‘संदेसे आते है’ गाणाऱ्या BSF जवानाचे सोशल मिडियावर कौतुक
3 केरळमधील ७० वर्षीय चहाविक्रेते दाम्पत्य फिरले २० देश; आनंद महिंद्रांनी घेतली दखल
Just Now!
X