सोशल मिडियावर जंगली प्राण्यांचे अनेक वेळोवेळी व्हिडिओ व्हायरल होत असतात. त्यातही मगर, सरपटणारे प्राणी किंवा अत्यंत वेगवान प्राण्यांनी केलेली शिकार यासारख्या व्हिडिओला तर लाखोंच्या संख्येने व्ह्यूज असता. अनेकदा हे व्हिडिओ पाहून प्राण्यांच्या क्षमेतबद्दल आश्चर्य वाटतं. असाच एक सर्वांना आश्चर्यचकित करणारा व्हिडिओ सध्या सोशल मिडीयावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये एक मगर दिसत आहे. आता मगर म्हटल्यावर तिचा मोठा जबडा, दात किंवा शिकारीचा एखादा व्हिडिओ असेल असं तुम्हाला वाटत असेल तर थांबा. कारण हा व्हिडिओ मगरीच्या वेगासंदर्भातील आहे. होय या व्हिडिओमध्ये एक मगर चक्क एका स्पीडबोटबरोबर स्पर्धा करताना दिसत आहे.

नक्की पाहा  >> Video : जंगलामध्ये सेल्फी काढत असतानाच मागून अस्वल आलं आणि…

गॅटर्स डेली या ट्विटर अकाऊंटवरुन हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. अवघ्या १३ सेकंदाच्या या व्हिडिओला सोशल मिडियावर चांगल्या संख्येने व्ह्यूज मिळाले आहेत. या व्हिडिओमध्ये वेगाने जाणाऱ्या स्पीडबोटच्या बाजूलाच पाण्यामधून अत्यंत वेगाने एक मगर पोहताना दिसत आहे. या शर्यतीदरम्यान मगर एकदा पाण्याच्या बाहेर आल्याचेही पाहायला मिळतं. या व्हिडिओला ७ लाख ४५ हजारहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. तर पाच हजार ६०० हून अधिक जणांनी हा व्हिडिओ शेअर केला आहे.

नक्की पाहा >> एकमेवाद्वितीय! भारतामध्ये पहिल्यांदाच आढळला ‘हा’ सुंदर प्राणी; पाहून व्हाल थक्क

या व्हिडिओवर अनेकांनी प्रतिक्रिया नोंदवल्या आहेत. अनेकांना हा व्हिडिओ पाहून आश्चर्य वाटल्याचे म्हटले आहे. एखादी मगर पहिल्यांदाच आपण एवढ्या वेगाने पोहताना पाहिली आहे असं काहींनी म्हटलं आहे. एका संशोधनानुसार मगर ही जमीनीपेक्षा पाण्यामध्ये अधिक वेगाने प्रवास करु शकते. पाण्यामध्ये मगरीची वेग १५ किमी प्रती तास इतका असू शकतो. काही जणांनी हा व्हिडिओ पाहून अंगावर काटा आल्याचे म्हटले आहे तर काहींनी हा व्हिडिओ कुठला आहे तेवढं सांगा म्हणजे तिथे कधी जायलाच नको अशी प्रतिक्रिया नोंदवली आहे.

सांगा पाहू उत्तर >> फोटोतील कोणता झेब्रा पुढे आणि कोणता मागे?; सारं जग शोधतंय उत्तर