04 March 2021

News Flash

स्टेजवर फक्त नवरीचेच फोटो काढत होता फोटोग्राफर, रागाच्या भरात नवऱ्याने मारली जोरदार… Viral Video

नवरीचे फोटो काढण्यात फोटोग्राफर विसरला भान...

( व्हायरल व्हिडिओवरुन घेतलेला स्क्रीनशॉट )

लग्नसमारंभातील वधू-वराचे किंवा नाचगाण्याचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. काही व्हिडिओ खूपच मजेशीर असतात जे बघताना हसून हसून लोटपोट व्हायला होतं. असाच एक लग्नाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालतोय. हा व्हिडिओ बघून तुम्हालाही हसू आवरणं कठीण होईल. कारण, या व्हिडिओत नवऱ्याने जे काही केलं त्याची तुम्ही कल्पनाही केली नसेल. तिथे उपस्थित पाहुण्यांनाही हसू आवरणं कठीण झालं होतं. नववधू तर हसून इतकी लोटपोट झाली की ती थेट स्टेजवरती बसूनच जोरजोरात हसायला लागली.

एका सामान्य लग्नातला हा व्हिडिओ आहे, जिथे फोटोग्राफर स्टेजवरती नवरा-नवरीचे फोटो घेतोय. फोटोग्राफर स्टेजवरती उभ्या असलेल्या नवरा-नवरीचे फोटो क्लिक करतो. सुरूवातीला तो दोघांचे एकत्र फोटो क्लिक करतो, पण नंतर तो नवऱ्याला बाजूला होण्यास सांगतो, आणि नवरीचे फोटो घेण्यास सुरूवात करतो. नवरीचे फोटो घेण्यात फोटोग्राफर इतका मग्न होतो की नवऱ्याकडे बघतही नाही.

थोड्यावेळात क्लोजअप फोटोशूटसाठी फोटोग्राफर नवरीच्या जवळ जाऊन तिचा चेहरा पकडून पोजिशन सांगतो, ते बघून बाजूला उभा असलेला नवरा इतका चिडतो की, तो फोटोग्राफरच्या जोरदार ‘टपली’ मारतो. हे बघून नवरीला हसू आवरणं कठीण होतं. ती हसून इतकी लोटपोट होते की चक्क स्टेजवरती बसूनच जोरजोरात हसायला लागते. हे दृश्य बघून उपस्थित पाहुणेमंडळींमध्येही एकच हशा पिकतो. लाखो लोकांनी हा व्हिडिओ बघितला असून त्यावर अनेक मजेशीर कमेंट्स येत आहेत. काहींनी हा नवरीने नवऱ्यावर केलेला ‘प्रँक’ होता असं म्हटलंय. तर, काहींना नवऱ्याचं वागणं खटकलं. नवरीला लग्नाच्या स्टेजवरतीच इतक्या मोकळेपणाने हसताना बघून अनेकजण तिचं कौतुकही करतायेत. नेटकऱ्यांच्या हा व्हिडिओ चांगलाच पसंतीस पडलाय. बघा व्हिडिओ :


सोशल मीडियावर सध्या हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात शेअर केला जात आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 8, 2021 8:35 am

Web Title: viral video wedding photoshoot the groom slaps the cameraman then the bride lies on the stage laughing watch funny video sas 89
Next Stories
1 विजय वडेट्टीवारांनी शेअर केला ताडोबातील काळ्या बिबट्याचा VIDEO
2 Farmer Protest : रिहानाच्या हातात पाकिस्तानी झेंडा? जाणून घ्या व्हायरल फोटोमागचं सत्य
3 Viral: शौचालयात बिबट्यासोबत अडकला कुत्रा; पुढे काय झालं ते एकदा बघाच
Just Now!
X