जंगलाचा राजा अशी ओळख असलेल्या सिंह कधी गवत खात नाही अशी म्हण आपल्याकडे प्रचलित आहे. मात्र, या म्हणीला छेद देणारा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियात व्हायरल झाला आहे. यामध्ये एक सिंह चक्क गवत खाताना दिसतो आहे. हा व्हायरल व्हिडिओ पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी यावर आश्चर्य व्यक्त केले आहे.

व्हायरल झालेला व्हिडिओ गुजरातच्या अमरेली जिल्ह्यातील खांबा भागातील गिर अभयारण्यातील आहे. जंगल सफारी करीत असताना एका पर्यटकाला मोठ्या हिरवळीच्या ठिकाणी एक सिंह चक्क गवत खाताना दिसला, त्यामुळे त्याने हे अजब दृश्य तत्काळ आपल्या कॅमेरॅत चित्रीत करण्यास सुरुवात केली. त्यामुळे सिंहाने गवत खातानाच्या या दृश्याचे सुमारे दोन मिनिटांचे छायाचित्रण झाले, याच्या शेवटी हा सिंह उलटी करतानाही दिसत आहे.

Baramati Namo Maharojgar Melava
निमंत्रण पत्रिकेतील आणखी एक घोळ सुधारण्यासाठी प्रशासनाची धावाधाव
nashik bjp marathi news, pravin darekar marathi news
“मोदी द्वेष हेच महाविकास आघाडीचे सूत्र”, प्रवीण दरेकर यांची टीका
Jayant Patil on Ajit pawar letter
‘सत्तेमध्ये असल्याशिवाय विकास होत नाही’, अजित पवारांचं म्हणणं खरं; जयंत पाटील पुढे म्हणाले…
santhan rajiv gandhi case convict
राजीव गांधी हत्या प्रकरणातील दोषीचा सुटकेनंतर दोन वर्षांनी मृत्यू; आरोपी संथन कोण होता?

बुधवारी हा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झाल्यानंतर अनेक नेटिझन्सनी आश्चर्य व्यक्त केले. मात्र, उपवनसंरक्षक संदीप कुमार यांनी सांगितले की, जंगली प्राण्यांनी अशा प्रकारे गवत खाणे ही बाब नेहमीची आहे यात आश्चर्य वाटण्यासाऱखे काहीही नाही. कारण, जेव्हा मांसाहारी प्राण्यांनी खाल्लेले कच्चे मांस त्यांना व्यवस्थित पचत नाही आणि त्यांचे पोट बिघडते तेव्हा ते अशा प्रकारे गवत खातात. गवत खाल्यामुळे ते उलटी करतात या प्रक्रियेद्वारे त्यांच्या पोटातील नको असलेले घटक उलटीद्वारे बाहेर पडतात. हा त्यांच्यासाठी नैसर्गिक उपाय आहे.

दरम्यान, जुलै महिन्यांत वन मंत्रालयाने जाहीर केले होते की, गुजरातच्या गिर अभयारण्यातील सिंहांच्या गळ्यात रेडिओ कॉलर बसवण्यात येणार आहेत. यामुळे वन खात्याकडून त्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यात येईल. देशाची शान असलेल्या या वन्य प्राण्याला वाचवण्यासाठी त्याच्या प्रकृतीवर लक्ष ठेवण्यासाठी याचा वापर होईल.