जंगलामध्ये अनेक अद्भूत गोष्टी घडत असतात. येथे जिवंत राहण्यासाठी रोज मृत्यूशी झुंज द्यावी लागते. तर कधी या जंगली प्राण्यांच्या थक्क करणाऱ्या कसरती आपल्याला आश्चर्यचकित करतात. कधीतरी जंगलामधील हा थरार कॅमेरामध्ये रेकॉर्ड होतो आणि त्याची चर्चा होते. असाच एक व्हिडिओ सध्या ट्विटवर चर्चेचा विषय ठरत आहे आणि हा व्हिडिओ पाहून तुम्ही नक्कीच थक्क व्हाल.

सध्या सोशल नेटवर्किंगवर व्हायरल झालेल्या एका व्हिडिओमध्ये एक हरिण पाठवण्यावर पाणी पिताना दिसत आहे. हे हरिण पाणी पित असतानाच पाण्यामधून मोठी मगर या हरिणाची शिकार करण्याच्या उद्देशाने बाहेर येते. मात्र हरिण चपळता दाखवत मगर बाहेर येते त्या क्षणी उडी मारुन आपला जीव वाचवते. सुशांत नंदा या आयएफएस अधिकाऱ्याने त्याच्या ट्विटर अकाऊंटवरुन हा व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओला एक मजेदार पण सपक कॅप्शन दिली आहे. “आपल्या शरिराचे महत्वाचे काम असते मेंदू सोबत घेऊन फिरणे आणि मुख्य म्हणजे गरज असेल त्यावेळी हलचाल करुन चपळता दाखवत जीव वाचवणे,” अशी कॅप्शन नंदा यांनी दिली आहे.

Tata Punch Car sale
टाटाच्या ‘या’ सर्वात स्वस्त SUV नं Wagon R, Dzire चं वर्चस्व संपवलं? झाली दणक्यात विक्री, मायलेज २६ किमी
canada student visa (1)
कॅनडाच्या ‘त्या’ निर्णयाने भारतीय विद्यार्थी अडचणीत, स्टडी व्हिसाऐवजी व्हिजिटर व्हिसावर कॅनडाला जाण्याच्या प्रयत्नात; कारण काय?
Bengaluru firm workers hire goons to beat strict colleague arrested video viral
कामाचा दबाव टाकणाऱ्या व्यवस्थापकाला कर्मचाऱ्यांनी गुंडांच्या मदतीने केली बेदम मारहाण; पाहा धक्कादायक Video
people washing plates in fountain in wedding
Viral Video : लग्नात सजावटीसाठी लावला होता पाण्याचा कारंजा, पण लोकांनी जेवणाची ताटं धुतली, एकदा व्हिडीओ पाहाच

हा व्हिडिओ व्हायरल झाला असून ३२ हजारहून अधिक व्ह्यूज या व्हिडिओला मिळाले आहेत. तर अनेकांनी कमेंट करुन या हरिणाच्या चपळाईचं कौतुक केलं आहे.

भन्नाट

काय वेग आहे

वा काय चपळता आहे

हे कमी वयातच शिकलेलं फायद्याचं

योग्य समतोल

हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आणि त्याबद्दल तुमची प्रतिक्रिया काय हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा.