News Flash

Video : नवस फेडायला गेली अन् फजिती करुन बसली

हा व्हिडीओ पाहून तुम्हालाही हसू आवरणार नाही

(व्हायरल व्हिडिओचा स्क्रीनशॉट)

सोशल मीडियावर सध्या एक व्हिडीओ तुफान व्हायरल झाला आहे. गुजरातच्या एका मंदिरातील हा व्हिडिओ असल्याचं सांगितलं जात आहे. या मंदिराच्या बाहेर हत्तीची एक दगडी मूर्ती दिसत आहे. एक महिला त्या मूर्तीच्या खालून बाहेर निघण्याचा प्रयत्न करताना या व्हिडिओत दिसत आहे. नवस फेडण्याचा हा प्रकार असल्याची चर्चा आहे. मूर्तीच्या खालून बाहेर निघण्याच्या प्रयत्नात संबंधित महिला मध्येच अडकते अन् स्वतःचीच फजिती करुन बसते. अनेकदा प्रयत्न करुनही तिला त्या मूर्तीखालून काही केल्या बाहेर निघता येत नाही. अखेरीस तेथे उपस्थित इतर महिला तिला खेचून बाहेर काढण्याचा प्रयत्न करतात व अडकलेल्या महिलेची सुटका करतात. हा व्हिडीओ पाहून तुम्हालाही हसू आवरणार नाही. पाहा व्हिडिओ –

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 24, 2019 9:32 am

Web Title: viral video woman gets stuck under elephant statue at gujarat temple sas 89
Next Stories
1 पंतप्रधान मोदी, गृहमंत्री शाह कोणता फोन वापरतात?
2 विमानात झोप लागल्याने अडकून पडलेल्या बाईची गोष्ट!
3 तैमुर आणि गोडसेबाबत ट्विट करुन MTNL ची झाली फजिती !
Just Now!
X